बुलढाणा : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रविवारी बुलढाणा दौऱ्यावर आहेत. त्या ठिकाणी विविध विकास कामांचे भूमिपूजन कार्यक्रमाला फडणवीस त्या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यावेळी फडणवीसांनी विरोधकांवर हल्लाबोल केला आहे. विरोधक आपल्या योजनेच्या विरोधात उच्च न्यायालयात गेले. सावत्र भावांच्या कितीही पोटात दुखलं तरी सख्खे भाऊ योजना बंद करू देणार नाहीत अशा शब्दात त्यांनी विरोधकांवर शब्दबाण केला आहे.