Overseas Education and Immigration : स्थलांतरासंबंधीचे नियम दिवसेंदिवस कठोर झाले आहेत. अमेरिकेसह कॅनडा, ऑस्ट्रेलिया आणि युरोपातील देशांमध्ये अभ्यास करण्याचा खर्च गेल्या एका वर्षात सुमारे 7 ते 10 टक्क्यांनी वाढला आहे, असे परदेशातील शिक्षण आणि स्थलांतर सल्लागारांचे म्हणणे आहे. रुपयाच्या तुलनेत डॉलरचे (Dollar vs Rupee) मूल्य वाढल्याने परदेशात शिक्षणासाठी गेलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांना खर्चाची जुळवाजुळव करणे मोठे आव्हान बनले आहे.
व्हिसा नियमांमधील कठोरतेचा दुहेरी फटका
तज्ज्ञांच्या मते, व्हिसा नियम आणखी कठोर झाल्यामुळे विद्यार्थी आधीच हवालदिल झालेले होते. आता व्हिसा शुल्क (Visa Fee) आणि विमानाचे भाडे (Flight Fare) यासह चौफेर खर्च वाढला आहे. याशिवाय, भारताचे (India Foreign Relations) काही देशांशी बिघडत असलेले संबंध देखील पालकांवरील हा आर्थिक भार (Financial Burden) आणखी वाढवत आहेत.
हेही वाचा - IT Jobs: या आयटी कंपनीमध्ये शिक्षणाविना नोकरी मिळेल! कसं शक्य आहे हे? जाणून घ्या
पालकांची खर्चात कपात आणि कर्जाचा आधार
परदेशात मुलांना शिकवणाऱ्या पालकांसाठी डॉलरच्या तुलनेत घसरत असलेला रुपया एखाद्या दुःस्वप्नासारखा आहे. याच कारणामुळे काही पालकांना शैक्षणिक कर्जाचा टॉपअप घ्यावा लागत आहे, तर काही पालकांना आपले खर्च कमी करावे लागत आहेत, जेणेकरून त्यांचे पाल्य परदेशात टिकून राहू शकेल आणि आपला अभ्यास पूर्ण करू शकेल.
अभ्यासासोबत राहण्याचा खर्चही वाढला
अनेक मुला-मुलींचे पालक ऐपत नसतानाही त्यांना शिकवण्यासाठी किंवा परदेशात उच्च शिक्षण मिळावे म्हणून धडपडत असतात. यासाठी पेलवत नसलेला खर्च उचलताना अनेकदा त्यांची सर्व पुंजी संपून जाते. स्वतःची मालमत्ता विकण्याचा निर्णयही सर्रास घेतला जातो. कित्येक पालक स्वतः कर्जबाजारीही होतात. तसेच, मुलेही शिक्षणासाठी कर्ज घेतात. यासह परदेशवारी, तिथे राहणे-खाणे इतर खर्च वाढत राहतात. यातून मोठे दुष्टचक्र तयार होते. अशा स्थितीत शिक्षण अर्धवट बंद करणेही परवडणारे नसते किंवा काही वेळेस ते पैशांअभावी बंदही पडू शकते.
हेही वाचा - Maharashtra Government: विद्यार्थ्यांच्या परदेशी रोजगार स्वप्नांना ब्रेक; जर्मनी प्रकल्पात राज्य सरकारची उदासीनता चर्चेत
शैक्षणिक कर्ज (Education Loan) घेऊन मुलांना परदेशात शिकवणारे पालक आता कर्जाच्या दलदलीत अडकल्यासारखे (Debt Trap) अनुभवत आहेत. या क्षेत्रातील माहितगार आणि जाणकार सल्लागार यातील अनेक भीषण अनुभव सांगत आहेत. आताच्या स्थितीत या सर्व बाबी अधिकच गंभीर होण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.