Tuesday, November 11, 2025 10:31:43 AM

Rajvir Jawanda Passes Away: प्रसिद्ध पंजाबी गायक राजवीर जावंदा यांचे निधन; 11 दिवसांच्या उपचारानंतर अखेर मृत्यूशी झुंज अपयशी

राजवीर यांचे 11 दिवसांच्या उपचारानंतर निधन झाले आहे. वयाच्या अवघ्या 35 व्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतला. या दुःखद घटनेने त्यांच्या चाहत्यांमध्ये आणि संगीतसृष्टीत शोककळा पसरली आहे.

rajvir jawanda passes away प्रसिद्ध पंजाबी गायक राजवीर जावंदा यांचे निधन 11 दिवसांच्या उपचारानंतर अखेर मृत्यूशी झुंज अपयशी

Rajvir Jawanda Passes Away: पंजाबी संगीतविश्वाला हादरवणारी बातमी समोर आली आहे. लोकप्रिय गायक राजवीर जावंदा यांची अखेर मृत्यूशी झुंज हरली आहे. राजवीर यांचे 11 दिवसांच्या उपचारानंतर निधन झाले आहे. वयाच्या अवघ्या 35 व्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतला. या दुःखद घटनेने त्यांच्या चाहत्यांमध्ये आणि संगीतसृष्टीत शोककळा पसरली आहे. राजवीर जावंदा हे 7 सप्टेंबर रोजी झालेल्या भीषण रस्ते अपघातात गंभीर जखमी झाले होते. त्यानंतर त्यांना मोहालीतील फोर्टिस रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. अपघातानंतर ते सतत व्हेंटिलेटरवर होते आणि डॉक्टर त्यांना स्थिर करण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करत होते. मात्र, गेल्या 10 दिवसांपासून त्यांच्या प्रकृतीत कोणतीही सुधारणा होत नव्हती. अखेर 11 व्या दिवशी त्यांनी प्राण सोडले.

हेही वाचा - Baahubali 3 Rumors vs Reality : बाहुबली चित्रपटाचा सिक्वल येणार?; 'बाहुबली: दी एपिक'च्या अखेरीस होणार खुलासा, प्रेक्षकांमध्ये उत्सुकता

डॉक्टरांच्या माहितीनुसार, अपघातानंतर त्यांच्या मज्जासंस्थेवर गंभीर परिणाम झाला होता. मेंदूपर्यंत पुरेसा ऑक्सिजन पोहोचत नसल्याने परिस्थिती गंभीर बनली होती. सततच्या औषधोपचारांनंतरही आणि तज्ज्ञांच्या प्रयत्नांनंतरही त्यांना वाचवता आले नाही. दरम्यान, अपघाताची माहिती देताना पोलिसांनी सांगितले की, राजवीर शिमला येथे प्रवास करत असताना पिंजोर–नालागड रस्त्यावर त्यांचा अपघात झाला. रस्त्यावर अचानक दोन बैल आले आणि त्यांना वाचवण्याच्या प्रयत्नात त्यांचा दुचाकीवरील ताबा सुटला. परिणामी समोरून येणाऱ्या बोलेरो वाहनाशी धडक बसली. या धडकेत ते गंभीर जखमी झाले होते.

हेही वाचा - Richest Youtuber In India: भारतातील सर्वांत श्रीमंत यूट्यूबर्सच्या यादीत 'हा' ठरला नंबर वन

राजवीर जावंदा यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक सुपरहिट गाणी दिली. त्यांची ‘काली कॅमारो’, ‘शानदार’ आणि ‘मुछ ते माशूक’ ही गाणी विशेष लोकप्रिय ठरली होती. त्यांनी आपल्या आवाजाने असंख्य चाहत्यांची मने जिंकली होती. संगीतविश्वासह चाहत्यांनी राजवीर यांच्या निधनावर शोक व्यक्त केला असून त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.


सम्बन्धित सामग्री