Monday, October 14, 2024 02:33:39 AM

Mumbai
मुंबईत बेस्ट बस वाहकावर जीवघेणा हल्ला

मुंबईत बेस्ट बसच्या वाहकावर जीवघेणा हल्ला झाला. हल्ला प्रकरणी पोलीस तपास सुरू आहे.

मुंबईत बेस्ट बस वाहकावर जीवघेणा हल्ला

मुंबई : राज्याच्या राजधानीत मुंबईत एक धक्कादायक घटना घडली. रेल्वे व्यतिरिक्त मुंबईकरांची दुसरी जीवनवाहिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बेस्ट बसच्या वाहकावर जीवघेणा हल्ला झाला. मोबाईल चोर शाहबाज खानच्या हल्ल्यात बसवाहक जखमी झाला आहे. शाहबाज मोबाईल चोरुन बसमधून पळण्याच्या प्रयत्नात होता. पण वाहकाने त्याला पकडले. वाहकामुळे अडचणीत सापडल्याची जाणीव होताच शाहबाजने बेस्ट बसच्या वाहकावर धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात जखमी झालेल्या बेस्ट बसच्या वाहकावर रुग्णालयात उपचार सुरू आहे. हल्ला प्रकरणी पोलीस तपास सुरू आहे. 


सम्बन्धित सामग्री






jaimaharashtranews-logo