मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोराच्या वडिलांनी वांद्रे येथे राहत्या घराच्या इमारतीवरुन उडी मारुन आत्महत्या केली. आत्महत्येचे कारण अद्याप समजलेले नाही. या प्रकरणी पोलीस तपास सुरू आहे.
मलायकाचे वडील अनिल अरोरा यांनी सकाळी नऊच्या सुमारास आत्महत्या केली. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस घटनास्थळी पोहोचले. कायद्यातील तरतुदींनुसार कारवाई सुरू आहे.