शेअर बाजाराची आजची सुरवात निराशाजनक ठरली आहे. सेन्सेक्स 400 अंकांनी घसरून 82,151.07 वर आला, तर एनएसई निफ्टी 88.95 अंकांनी घसरून 25,238.10 वर आला आहे. तसेच नंतर घसरण कमी झाली. सकाळी 10 वाजेपर्यंत, सेन्सेक्स त्याच्या आधीपेक्षा 100 अंकांनी खाली होता, तर निफ्टी 15 अंकांनी खाली होता.
बाजार विश्लेषकांच्या मते, जीएसटी कपातीचा परिणाम शेअर बाजारावर जाणवेल. तथापि, एच-1बी व्हिसा शुल्कात वाढ झाल्यामुळे बाजारात काही प्रमाणात मंदी येऊ शकते, जी नंतर स्थिर होऊ शकते. याचा थेट परिणाम भारतीय आयटी कंपन्यांच्या व्यवसाय मॉडेलवर होईल असे तज्ज्ञांचे मत आहे.
हेही वाचा- Gold Rate Today : नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी सोनं इतक्या रूपयांनी महागलं ; जाणून घ्या आजचे दर
टेक महिंद्रा, इन्फोसिस, एचसीएल टेक आणि टीसीएस सारख्या प्रमुख कंपन्यांचे शेअर्स 2.26 % ने घसरून 3.88 % वर आले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एच-1बी व्हिसा शुल्क प्रति कामगार 1 लाख डॉलरपर्यंत वाढवण्याच्या निर्णयामुळे आयटी क्षेत्राची चिंता वाढली आहे.
हेही वाचा- GST 2.0: आजपासून जीएसटी करात बदल, कोणत्या वस्तू स्वस्त अन् कोणत्या महाग? वाचा संपूर्ण यादी
शुक्रवारी अमेरिकन बाजार वधारले, जागतिक तेल बेंचमार्क ब्रेंट क्रूड 0.66% वाढून 67.12 डॉलर प्रति बॅरलवर पोहोचला.