Tuesday, May 20, 2025 04:28:22 PM

श्रीमंत व्हायचंय? मग हे 7 फॉर्म्यूले तुमच्यासाठी वरदान! पैशाला पैसा जोडला जाईल..

Financial Tips : पैसे कमवण्याचा कोणताही शॉर्टकट नाही आणि चुकीचे मार्ग अवलंबून भलतीकडे पोहोचण्यात काही अर्थ नाही. तेव्हा, चांगले नियोजन आणि नियमित गुंतवणूक करून तुम्ही नक्कीच मोठी रक्कम उभारू शकता.

श्रीमंत व्हायचंय मग हे 7 फॉर्म्यूले तुमच्यासाठी वरदान पैशाला पैसा जोडला जाईल

मुंबई : 10 ते 20 वर्षांत दणदणीत बँक बॅलन्स असावा आणि आपलं भविष्यही सुरक्षित व्हावं, अशी इच्छा असेल तर, तुमच्या मंथली इन्कमच्या 40% बचत करा आणि गुंतवणूक करा. तुमच्या गुंतवणुकीच्या पोर्टफोलिओचा 40% भाग म्युच्युअल फंड किंवा स्टॉकमध्ये ठेवा आणि 12% सरासरी वार्षिक रिटर्न मिळवण्याचे लक्ष्य ठेवा.

पैसे कमवण्याचा कोणताही शॉर्टकट नाही आणि चुकीचे मार्ग अवलंबून भलतीकडे पोहोचण्यात काही अर्थ नाही. तेव्हा, चांगली रणनीती आणि नियमित गुंतवणूकीसह, तुम्ही नक्कीच मोठा निधी उभारू शकता. योग्य पद्धीतने आणि चांगल्या मार्गाने श्रीमंत होण्यासाठी शिस्त, संयम आणि चांगली गुंतवणूक रणनीती आवश्यक आहे. आज आम्ही तुम्हाला हे कसे करता येईल, यासांबंधी काही खास टिप्स देणार आहोत, ज्यांचा अवलंब करून तुमच्याजवळ मोठी रक्कम उभी राहू शकते.

हेही वाचा - SIP गुंतवणूक तुम्हाला बनवेल करोडपती! सविस्तर जाणून घ्या, याचं गणित

72 चा नियम : तुमचे पैसे दुप्पट होण्यासाठी किती वेळ लागेल हे जाणून घेण्यासाठी, तुम्हाला तुमच्या गुंतवणुकीवर मिळणाऱ्या व्याजदराने 72 ला भागावे लागेल. उदाहरणार्थ, 7% व्याजदर मिळत असेल तर, 72 भागिले 7 असे गणित करावे लागेल. याचे उत्तर 10.28 येते. म्हणजेच, तुमचे पैसे अंदाजे 10.28 वर्षांत दुप्पट होतील.

10-12-10 नियम : 10 वर्षांसाठी 12% वार्षिक रिटर्न देणाऱ्या गुंतवणुकीत दरमहा 10,000 रुपये गुंतवून तुम्ही सुमारे 23-24 लाख रुपये जमा करू शकता. त्याच रिटर्नवर, 1 कोटी रुपयांसाठी, 10 वर्षांसाठी दरमहा सुमारे 43,000 रुपये गुंतवावे लागतील.

20-10-12 नियम : 20 वर्षांसाठी 12% वार्षिक रिटर्न देणाऱ्या गुंतवणुकीत दरमहा 10,000 रुपये गुंतवून 1 कोटी रुपयांचा निधी तयार करता येतो.

50-30-20 नियम : तुमच्या उत्पन्नाच्या 50% भाग आवश्यक खर्चासाठी, 30% भाग शौक आणि मनोरंजनासाठी आणि 20% भाग बचत आणि गुंतवणुकीसाठी द्या. हाही मार्ग पैसे साठवण्यासाठी उपयुक्त आहे.

40-40-12 नियम : 10-20 वर्षांत मोठी रक्कम उभारण्यासाठी तुमच्या मासिक उत्पन्नाच्या 40% बचत करा आणि गुंतवणूक करा. पोर्टफोलिओचा हा 40% भाग म्युच्युअल फंड किंवा स्टॉकमध्ये ठेवा आणि 12% सरासरी वार्षिक रिटर्न मिळवण्याचे लक्ष्य ठेवा.

15-15-15 नियम : 15% सरासरी वार्षिक रिटर्न देणाऱ्या ऑप्शनमध्ये 15 वर्षांसाठी दरमहा 15,000 रुपये गुंतवल्यास सुमारे 1 कोटी रुपयांची रक्कम जमा होऊ शकते.

25X नियम : तुम्हाला लवकर निवृत्त व्हायचे असेल तर, तुम्हाला तुमच्या 1 वर्षाच्या खर्चाच्या 25 पट रक्कम लागेल. उदाहरणार्थ, जर तुमचा वार्षिक खर्च 4 लाख रुपये असेल, तर तुम्हाला 1 कोटी रुपयांचा रिटायरमेंट फंड आवश्यक आहे. एसआयपी सारख्या ऑप्शनद्वारे हे ध्येय साध्य करता येते.

हेही वाचा - लवकरच कमी होऊ शकतात पेट्रोल-डिझेलचे दर; क्रूडच्या किमतीत 5 वर्षातील सर्वात मोठी घसरण

(Disclaimer : शेअर बाजारातील गुंतवणूक जोखमीची आहे. नियम व अटी काळजीपूर्वक वाचा. जय महाराष्ट्र कोणत्याही नफ्या-तोट्यास जबाबदार नाही. गुंतवणुकीपूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)


सम्बन्धित सामग्री