Sunday, January 26, 2025 07:41:38 PM

Fire Breaks Out at Nanded MIDC
नांदेडमधील एमआयडीसीत आग : चार जण जखमी

नांदेड येथील सिडको परिसरात एमआयडीसीमध्ये आज दुपारी १२ वाजेच्या सुमारास ऑइल इंडस्ट्रीजमध्ये भीषण आग लागली.

नांदेडमधील एमआयडीसीत आग  चार जण जखमी

नांदेड : नांदेड येथील सिडको परिसरात एमआयडीसीमध्ये आज दुपारी १२ वाजेच्या सुमारास ऑइल इंडस्ट्रीजमध्ये भीषण आग लागली. या आगीमुळे चार कामगार जखमी झाले असून, त्यांना शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

आग लागण्याची घटना एक स्फोट झाल्यानंतर घडली. आगीच्या तिव्रतेमुळे परिसरात मोठा धुराचा लोट पसरला होता. मात्र, अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे. नांदेड महापालिकेच्या अग्निशमन दलाने झटपट घटनास्थळी पोहोचून आगीवर नियंत्रण मिळवले.

घटनास्थळी तातडीने मदत कार्य सुरू करण्यात आले असून, जखमींवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या दुर्घटनेमुळे क्षेत्रातील कामकाज ठप्प झाले आहे, परंतु आग पूर्णपणे नियंत्रित केल्यानंतर परिस्थिती सामान्य होईल, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.

या आगीच्या घटनेने एमआयडीसीतील ऑइल इंडस्ट्रीजच्या सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. पुढील तपास व कारणाचा शोध घेण्यासाठी संबंधित विभागांनी कार्यवाही सुरू केलेली आहे.


 


सम्बन्धित सामग्री