अमेरिका : अमेरिकेच्या लॉस अँजलिसमधील काऊंटीच्या सहा जंगलांमध्ये भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. धगधगणारी ही आग रहिवासी भागातही पोहोचली आहे. अमेरिकेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या दुर्घटनेत दहा जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली असून 1100 हून जास्त इमारती जळून खाक झाल्या आहेत. आगीमुळे एक लाखांहून अधिक लोकांचं स्थलांतर करण्यात आलंय.
जय महाराष्ट्र न्यूजच्या थेट संपर्कात राहण्यासाठी व्हॉट्सअप चॅनेल वर क्लिक करा.
अमेरिका आगीच्या भक्ष्यस्थानी
राज्याच्या इतिहासातील सर्वात मोठं आगीचं संकट
लॉस अँजलिसच्या हॉलिवूड थंड हवेच्या ठिकाणी बुधवारी आग लागली
गेले दोन दिवस आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न
सोसाट्याचा वारा वाहत असल्याने आग विझविण्यात अडचणी
शहरी भागात आग पसरल्यामुळे एक लाख लोकांचे स्थलांतर
आगीमुळे पन्नास बिलियन डॉलरहून अधिकचे नुकसान झालंय
जीवित आणि वित्तहानी वाढण्याची शक्यता
अमेरिका किंवा पाश्चिमात्य देशात अनेक ठिकाणी अशा भीषण आगी लागण्याच्या अनेक घटना दरवर्षी घडतात. त्याला ग्लोबल वॉर्मिंग हे कारण सांगितलं जातंय.
हेही वाचा : मुख्यमंत्री भेटीचा वाद विकोपाला
सातत्याने लागणाऱ्या आगीची कारणे
जोरदार वाहणारी हवा आणि पावसाचा अभाव या दोन मुख्य कारणांमुळे आगीच्या घटना
सोसाट्याच्या वाऱ्यामुळे आगीची व्याप्तीही पसरत आहे
कोरड्या वाऱ्यांमुळे आग अधिक काळ टिकून राहते
2024 हे आजवर नोंदवलं गेलेलं सर्वात उष्ण वर्ष ठरलं आहे
गेल्या पावणे दोनशे वर्षांमधलं हे सर्वात उष्ण वातावरण होतं
अलीकडच्या काही महिन्यांत इथे पाऊस पडलेला नाही. त्यानंतर हवामानही उष्ण राहिलंय
पावसानं दडी मारल्यानं वातावरण शुष्क आणि पाण्याची कमतरता यामुळे आगीची परिस्थिती निर्माण होते
नैसर्गिक वाऱ्यांमुळे वणवे पेटण्यास आणि ते पसरण्यास पोषक स्थिती निर्माण होते
शहरांची व्याप्ती वाढल्याने मानवी चुकांमुळेही आगीच्या घटनात वाढ
हेही वाचा : 25 जानेवारीपासून जरांगे पुन्हा उपोषणाला
अमेरिकेसारख्या प्रगत राष्ट्राला जंगलात लागणाऱ्या आगींच्या घटना नियंत्रणात आणताना अनेक अडचणी येत आहेत. निसर्गापुढे मानवनिर्मित यंत्रणा थीट्या पडत आहेत. यावरूनच आपण निसर्गाला जपण्याची आवश्यकता आहे. निसर्गावर होणारे जागितक आक्रमण पाहता भविष्यात आपल्याला त्याच्या परिणामांची अधिक दाहकता सोसावी लागणार आहे.