Tuesday, January 14, 2025 06:16:46 AM

Five-hour megablock on Central Railway on Sunday
रविवारी मध्य रेल्वेवर पाच तासांचा मेगाब्लॉक

मध्य रेल्वेवर माटुंगा ते मुलुंडदरम्यान अप आणि डाऊन धिम्या मार्गावर रविवारी पाच तासांचा मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे.


रविवारी मध्य रेल्वेवर पाच तासांचा मेगाब्लॉक 

मुंबई: मध्य रेल्वेवर माटुंगा ते मुलुंडदरम्यान अप आणि डाऊन धिम्या मार्गावर रविवारी पाच तासांचा मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. सकाळी ११:०५ पासून ते दुपारी ३:५५ या कालावधीत हा ब्लॉक घेण्यात येणार आहे. ब्लॉकदरम्यान सीएसएमटीवरून सुटणाऱ्या डाऊन धिम्या मार्गावरील गाड्या माटुंगा ते स्थानकांदरम्यान मुलुंड डाऊन जलद मार्गावर वळवण्यात येतील व मुलुंडपुढे, डाऊन धिम्या मार्गावर वळवण्यात येणार आहेत.
हार्बरवर कुर्ला ते वाशीदरम्यान अप आणि डाऊन मार्गावर सकाळी ११:१० ते दुपारी ४:१० या कालावधीत ब्लॉक असल्यामुळे वाशी/बेलापूर/पनवेल दरम्यानची सेवा पूर्णतः बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे हार्बर मार्गावर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कुर्ला आणि कुर्ला-पनवेल/वाशी दरम्यान विशेष सेवा चालवल्या जाणार आहेत.  


सम्बन्धित सामग्री