Friday, December 05, 2025 01:36:17 AM

Winter Health Tips: हिवाळ्यात चुकूनही खाऊ नका 'हे' सात पदार्थ; जाणून घ्या

हिवाळ्यात काही पदार्थ आहारात घेतल्याने सर्दी-खोकला, अपचन आणि थकवा वाढू शकतो. थंड पेये, तळलेले पदार्थ आणि अतिरिक्त साखर टाळल्यास रोगप्रतिकारक शक्ती मजबूत राहते आणि शरीर उबदार राहते.

winter health tips हिवाळ्यात चुकूनही खाऊ नका हे सात पदार्थ जाणून घ्या

Winter Health Tips: हिवाळा म्हणजे गारवा, उबदार अन्न, गरम पेये आणि शरीराला जास्त ऊर्जा लागण्याचा काळ. या मोसमात अनेकजण आपला आहार बदलतात, काही पदार्थ जास्त खातात तर काही गोष्टींकडे दुर्लक्ष करतात. पण हिवाळ्याच्या दिवसांत काही अन्नपदार्थ असे आहेत, जे शरीरावर उलट परिणाम करू शकतात. शरीराची रोगप्रतिकारक शक्ती कमी होणे, पचन बिघडणे, त्वचा कोरडी पडणे किंवा सर्दी-खोकला वाढणे अशी अनेक समस्यांना आमंत्रण दिले जाते. त्यामुळे खालील गोष्टी हिवाळ्याच्या आहारात चुकूनही समाविष्ट करू नयेत.

1. जास्त थंड पेये आणि आइसक्रीम

कडाक्याच्या थंडीत थंड पेये पिणे किंवा आइसक्रीम खाणे शरीराला अजिबात योग्य नाही. थंड पदार्थांमुळे घसा चिघळू शकतो आणि खोकला-सर्दी वाढू शकते. शरीराचं तापमान संतुलित ठेवण्यासाठी गरम पाणी, सूप किंवा हर्बल टी यासारखे पेये अधिक फायदेशीर ठरतात.

2. तळलेले आणि जास्त तेलकट पदार्थ

हिवाळ्यात अनेकांना वडा-पाव, भजी, समोसा यांसारखे तळलेले पदार्थ खायची इच्छा होते. पण हे पदार्थ पचायला जड असतात आणि पोटात जळजळ, आम्लपित्त, अपचन यांसारख्या समस्या निर्माण होऊ शकतात. शिवाय तेलकट पदार्थांमुळे वजन वाढण्याचा धोका वाढतो. त्यामुळे अशा पदार्थांचा मर्यादित वापर करावा किंवा शक्यतो टाळावा.

3. जास्त साखर आणि मिठाई

हिवाळा आला की गुळपोळ्या, लाडू, हलवा, केक यांची लगबग वाढते. पण जास्त साखर शरीरातील ऊर्जा लगेच वाढवते आणि तितक्याच वेगाने कमीही करते, ज्यामुळे थकवा जाणवतो. शिवाय साखरेचे प्रमाण वाढल्याने रोगप्रतिकारक शक्ती कमी होते. त्यामुळे गोडाचा मोह आवरून साखरेच्या ऐवजी गूळ किंवा मध मर्यादित प्रमाणात वापरणे चांगले.

4. जास्त कॅफिनयुक्त पेये

थंडीमध्ये चहा-कॉफीचे सेवन वाढणे अगदी नैसर्गिक आहे. मात्र दिवसातून अनेक वेळा कॅफिन घेणे शरीरातील पाणी कमी करते, ज्यामुळे त्वचा कोरडी पडते आणि डिहायड्रेशनची समस्या वाढते. त्यामुळे चहा-कॉफी मर्यादित प्रमाणात घेऊन त्याऐवजी हर्बल ड्रिंक्स किंवा सूपकडे वळणे चांगले.

5. थंड सलाड किंवा कच्चे पदार्थ

कच्चे सलाड, थंड फळे किंवा फ्रिजमध्ये ठेवलेले पदार्थ खाल्यास पचनसंस्था मंदावू शकते. हिवाळ्यात शरीराला उबदार अन्नाची आवश्यकता असते. त्यामुळे उकडलेली भाज्या, गरम सूप, खिचडी, दलिया यासारखे हलके आणि पचण्यास सोपे अन्न अधिक फायदेशीर ठरते.

6. जास्त प्रमाणात सिट्रस फळे

संत्रे, मोसंबी यांसारखी फळे आरोग्यासाठी उत्तम असली तरी हिवाळ्यात ती जास्त प्रमाणात खाल्यास घश्यावर ताण येऊ शकतो. ज्यांना वारंवार खोकला-सर्दी होत असेल त्यांनी या फळांचे सेवन मर्यादित ठेवणे आवश्यक आहे.

7. फास्ट फूड आणि पॅकबंद पदार्थ

हिवाळ्यात शरीराला अधिक पोषणाची गरज असते. पण वेगवेळ्या प्रसंगामुळे लोक पॅकबंद, प्रक्रिया केलेले किंवा फास्ट फूड जास्त खातात. अशा पदार्थांमध्ये सोडियम, संरक्षक द्रव्ये आणि ट्रान्स-फॅटचे प्रमाण जास्त असते, ज्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती कमजोर होते. हिवाळ्यात योग्य आहार घेतल्यास शरीर मजबूत राहते, सर्दी-खोकल्यासारख्या समस्या दूर राहतात आणि त्वचा-आरोग्य दोन्ही सुधारतात. त्यामुळे वरील पदार्थांना शक्यतो टाळा किंवा मर्यादित सेवन करा आणि गरम, पौष्टिक, घरगुती अन्नावर भर द्या.


सम्बन्धित सामग्री