केप कॅनव्हरल : बोइंगच्या अवकाशायानत झालेला बिघाड आणि मिल्टन चक्क्रीवादळ यामुळे आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकात अडकून पडलेले चार अंतराळवीर अखेर शुक्रवारी पृथ्वीवर परतले. मात्र, त्यामध्ये सुनीता विल्यम्स यांचा समावेश नाही. 'नासा'चे मॅथ्यू डॉमिनिक, मिखाईल बॅरंट आणि जेनेट एप्स आणि रशियाचे अलेक्झांडर ग्रेबेन्किन अशी पृथ्वीवर परतलेल्या अंतराळवीरांची नावे आहेत.