Kharmas 2026: हिंदू धर्मात 'खरमास' हा काळ कोणत्याही शुभ कार्यासाठी अशुभ मानला जातो. या काळात गृहप्रवेश, मुंडन आणि विवाह यांसारखे मांगलिक कार्यक्रम करण्यास मनाई असते. ज्योतिषशास्त्रानुसार, जेव्हा सूर्य मीन किंवा धनु राशीत प्रवेश करतो, तेव्हा खरमास लागतो. यंदा मार्च महिन्यात खरमास सुरू होणार असून, त्यानंतर महिनाभर लग्नाची सनई वाजणार नाही. त्यामुळे जर तुम्ही विवाहाचे नियोजन करत असाल, तर मार्चच्या सुरुवातीचे काही दिवस तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत.
खरमास कधी सुरू होणार आणि कधी संपणार?
'द्रिक पंचांग'नुसार, रविवार, 15 मार्च 2026 रोजी पहाटे 1:08 वाजता सूर्य मीन राशीत प्रवेश करेल. या क्षणापासून खरमास सुरू होईल, जो पुढील एक महिना म्हणजे 14 मार्च 2026 पर्यंत राहील. 14 मार्च रोजी सकाळी 9:38 वाजता सूर्य मेष राशीत प्रवेश करेल आणि त्यानंतरच पुन्हा शुभ कार्यांना सुरुवात होईल. 15 मार्चपासून 14 एप्रिलपर्यंतच्या या काळात नवीन व्यवसाय सुरू करणे किंवा जमीन खरेदी करणे देखील टाळले जाते.
मार्च 2026 मधील लग्नाचे 8 शुभ मुहूर्त
खरमास सुरू होण्यापूर्वी मार्च महिन्यात लग्नासाठी केवळ 8 शुभ तारखा उपलब्ध आहेत. या तारखांनंतर महिनाभर विवाहाचे मुहूर्त नसतील.
मार्चमधील लग्नाच्या शुभ तारखा
2 मार्च 2026 – सोमवार
3 मार्च 2026 – मंगळवार
4 मार्च 2026 – बुधवार
7 मार्च 2026 – शनिवार
8 मार्च 2026 – रविवार
9 मार्च 2026 – सोमवार
11 मार्च 2026 – बुधवार
12 मार्च 2026 – गुरुवार
हेही वाचा - Chandra Grahan 2026: सिंह राशीत चंद्रग्रहणाची चाहूल; 'या' 5 राशींसाठी असणार अडचणींचा काळ
खरमास दरम्यान कोणत्या गोष्टी टाळाव्यात?
खरमासच्या काळात विवाहाचा शुभ काळ अशुभ मानला जातो. या काळात विवाह, साखरपुडा, गृहप्रवेश, मुंडन समारंभ, नवीन घर किंवा जमीन खरेदी आणि नवीन व्यवसायाची मुहूर्तमेढ करणे शास्त्रानुसार निषिद्ध मानले जाते. या सर्व कामांसाठी खरमास संपण्याची प्रतीक्षा करणे शुभ मानले जाते. त्यामुळे तुमच्या कुटुंबातील कोणत्याही मोठ्या निर्णयासाठी तुम्ही पुजाऱ्याचा सल्ला घेऊन या मार्चमधील उपलब्ध तारखांचा विचार करू शकता.