मुंबई : मराठा समाजाला आरक्षण मिळणार असेल तर सरकारला पाठिंबा देऊ अशी भूमिका राशपने घेतली. यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट आव्हान दिले. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यासाठी पाठिंबा देत असल्याचे शरद पवारांकडून लिहून घ्या. फडणवीस यांनी हे आव्हान देताच जरांगेंनी नरमाईचे धोरण घेतले. मराठा आरक्षणासाठी उपोषण करत असलेल्या जरांगेंनी तब्येतीचे कारण पुढे करुन उपोषण स्थगित केले.