Tuesday, December 10, 2024 09:52:42 AM

Raj Thackeray
'मनसेला सत्ता द्या, रस्त्यावरची नमाज बंद करू'

मनसेला सत्ता द्या, रस्त्यावरची नमाज बंद करू अशी राजगर्जना घाटकोपरमध्ये झाली.

मनसेला सत्ता द्या रस्त्यावरची नमाज बंद करू

मुंबई : मनसेला सत्ता द्या, रस्त्यावरची नमाज बंद करू अशी राजगर्जना घाटकोपरमध्ये झाली. मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी घाटकोपरच्या प्रचारसभेत बोलताना मनसे सत्तेत आल्यास रस्त्यावरची नमाज बंद करण्याचे आश्वासन दिले. मशिदींवरचे बेकायदा भोंगे काढून टाकू असेही आश्वासन राज ठाकेरेंनी दिले. 

आम्ही सत्तेत नसूनही टोलप्रश्न हाती घेतला आणि मुंबईत येण्याजाण्याच्या मार्गांवर असलेले सर्व टोल बंद झाले आहेत. सामान्यांना दिलासा मिळाला आहे. हा विषय इतर कोणीही हाती घेत नव्हते. कारण सगळ्यांचेच हात यात अडकले होते. पण मनसेने टोलचा झोल सोडवला आहे; असे राज ठाकरे म्हणाले.

राज्यात उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वातले मविआ सरकार सत्तेत असताना मनसेने मशिदींवरच्या बेकायदा भोंग्यांच्या विरोधात आंदोलन केले. या आंदोलनासाठी १७ हजारांपेक्षा जास्त मनसैनिकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. आता सत्तेत आल्यावर मशिदींवरचे उरले सुरलेले बेकायदा भोंगेही हटवू असे मनसेप्रमुख राज ठाकरेंनी जाहीर केले. 

रेल्वे भरतीसाठी महाराष्ट्रात मराठी वृत्तपत्रांमध्ये मराठी भाषेत जाहिराती यायलाच पाहिजे. हे होत नसल्यास संसदेत खासदारांनी जाब विचारणे आवश्यक आहे. पण एकटी मनसे प्रयत्न करत आहे. संसदेत कोणीही लोकप्रतिनिधी या विषयावर भाष्य करत नाही; असे राज ठाकरे म्हणाले. मनसे सत्तेत आल्यास हा प्रश्न प्राधान्याने सोडवू, असेही राज ठाकरे म्हणाले. 

दुकानांवरच्या मराठी पाट्या, शहरांचे नियोजन यांसह असे अनेक प्रश्न आहेत जे अद्याप पूर्ण सुटलेले नाहीत. मनसेची सत्ता आल्यास हे प्रश्न हमखास सुटतील, असे आश्वासन मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी दिले. 


सम्बन्धित सामग्री






jaimaharashtranews-logo