Monday, March 09, 2026 02:46:31 AM

Gold Rates : गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी; सोनं 80 हजारांवर येणार? 'हा' बदल ठरणार मोठा टर्निंग पॉइंट

सध्या चीन, भारत आणि इतर मोठ्या देशांनी सोन्याची खरेदी कमी करण्याचे संकेत दिले आहेत. मागणीत घट झाल्यास किमतींवर दबाव निर्माण होईल. मात्र, सामान्य खरेदीदारांनी सावध राहणे आवश्यक आहे.

gold rates  गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी सोनं 80 हजारांवर येणार हा बदल ठरणार मोठा टर्निंग पॉइंट

Will Gold Rates come down to 80,000 Rupees? : सोन्याच्या दरांनी सध्या ऐतिहासिक उच्चांक गाठला असून सामान्य गुंतवणूकदार आणि खरेदीदारांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. यावर्षी 24 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम तब्बल 1,76,121 रुपयांपर्यंत पोहोचला आहे. मात्र, जागतिक अर्थकारणातील बदलत्या हालचाली पाहता, हेच सोने पुन्हा 80,000 रुपयांपर्यंत खाली येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

ब्रिक्स देशांची मोठी खरेदी आणि डॉलरचा प्रभाव
सोन्याच्या किमती वाढण्यामागे आंतरराष्ट्रीय आर्थिक अस्थिरता आणि 'ब्रिक्स' (BRICS) देशांची (ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका) मोठी खरेदी कारणीभूत आहे. गेल्या सहा महिन्यांत जगभरात झालेल्या एकूण सोन्याच्या खरेदी पैकी 50 टक्के वाटा एकट्या ब्रिक्स देशांचा आहे. अमेरिकन डॉलरवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी या देशांनी सोन्याचा साठा वाढवण्याची रणनीती आखली होती, ज्यामुळे मागणी वाढून किमती गगनाला भिडल्या.

रशियाची बदलती रणनीती आणि किमतीत घसरण
तज्ज्ञांच्या मते, रशिया आपली रणनीती बदलण्याच्या तयारीत आहे. रशियाने आंतरराष्ट्रीय व्यापारात पुन्हा डॉलरला प्राधान्य देण्याचे ठरवले, तर ते आपल्याकडील विशाल सोन्याच्या साठ्याची विक्री करू शकतात. जर रशियाने सोन्याचा साठा बाजारात विक्रीसाठी काढला, तर पुरवठा वाढून सोन्याच्या किमतीत मोठी घसरण पाहायला मिळेल. तसेच रशिया-युक्रेन युद्ध राजनैतिक चर्चेने संपल्यास जागतिक बाजारातील अनिश्चितता दूर होऊन सोन्याची चमक कमी होऊ शकते.

हेही वाचा - Indian Rupee Vs Dollar: डोनाल्ड ट्रम्प यांचा मास्टर प्लॅन फसला? जागतिक बाजारात भूकंप, पण भारतीय रुपयाची मात्र बाजी, काय घडलं?

ब्लूमबर्गचा चकीत करणारा अंदाज
ब्लूमबर्ग (Bloomberg) या नामांकित संस्थेने वर्तवलेल्या अंदाजानुसार, भारतात सोन्याचे दर येत्या काळात 70,000 ते 80,000 रुपये प्रति 10 ग्रॅमपर्यंत खाली येऊ शकतात. मात्र, ही घसरण अचानक न होता टप्प्याटप्प्याने होईल. जागतिक बाजारपेठेत स्थिरता आल्यास 2027 च्या अखेरीपर्यंत सोन्याचे दर 80,000 रुपयांच्या आसपास स्थिरावू शकतात, असा विश्लेषकांचा तर्क आहे.

खरेदीदारांसाठी महत्त्वाचा सल्ला
सध्या चीन, भारत आणि इतर मोठ्या देशांनी सोन्याची खरेदी कमी करण्याचे संकेत दिले आहेत. मागणीत घट झाल्यास किमतींवर दबाव निर्माण होईल. मात्र, जोपर्यंत किमती प्रत्यक्षात खाली येत नाहीत, तोपर्यंत सामान्य खरेदीदारांनी सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. डॉलरची मजबूती आणि युद्धाची समाप्ती या दोन गोष्टी सोन्याचे भवितव्य ठरवतील. तणाव वाढल्यास सोन्याचे दर आणखी वाढू शकतात, त्यामुळे बाजारातील ट्रेंड समजून घेऊनच गुंतवणूक करण्याचा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.

हेही वाचा - Gold Import India : भारताचा अमेरिकेसोबत ऐतिहासिक करार! सोने-चांदी आयातीचे समीकरण बदलणार; जाणून घ्या काय होतील परिणाम?


सम्बन्धित सामग्री