जळगाव : जळगावात सोन्याच्या दरात गेल्या 48 तासात 1 हजार रुपयांची वाढ झाली आहे. जीएसटीसह सोन्याच्या भावांनी 80 हजारांचा टप्पा गाठला. सोन्याच्या पाठोपाठ चांदीच्या भावातही दीड हजार रुपयांची वाढ झाली आहे.
हेही वाचा : मकर संक्रांतीला बनवा तिळगुळाचे लाडू
सोन्याच्या दरात गेल्या दोन दिवसात 1 हजार रुपयांची वाढ झाली असून जीएसटीसह सोन्याच्या भावाने 80 हजारांचा टप्पा गाठला आहे. सोन्याच्या पाठोपाठ चांदीच्या भावातही दीड हजार रुपयांची वाढ झाली असून जळगाव सुवर्ण नगरीमध्ये जीएसटीसह सोन्याचे भाव 80 हजार 650 रुपये तर चांदीचे भाव जीएसटीसह 93 हजार रुपयांवर पोहोचले आहे. दरम्यान जागतिक स्तरावर सोन्याच्या गुंतवणुकीत वाढ झाल्याने सोन्याच्या दरात वाढ झाल्याचे मत सोन्याच्या व्यापाऱ्यांनी व्यक्त केले आहे.
हेही वाचा : महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून पतंगप्रेमी येवल्यात
गेल्या महिन्यात सोन्याच्या दरात मोठी घसरण झाल्याचे पाहायला मिळाले. डिसेंबर महिन्यात दिल्लीच्या सराफ बाजारात सोने 1400 रूपयांनी घसरण होऊन 80 हजारांच्या खाली आले होते. 77 हजार 380 वर पोहोचले होते.