Friday, February 13, 2026 06:35:50 PM

Gold Price : दुष्काळात तेरावा..., ऐन लग्नसराईत सोन्याने उच्चांक गाठला; आजचे दर किती?

पौष महिना सरताच आता लग्नसराईला जोरदार सुरुवात झाली आहे. मात्र, लग्नसराईची धामधूम वाढत असतानाच सोन्याच्या वाढत्या दरांनी सामान्यांचे बजेट कोलमडले आहे.

gold price  दुष्काळात तेरावा ऐन लग्नसराईत सोन्याने उच्चांक गाठला आजचे दर किती

जागतिक बाजारातील घडामोडी आणि लग्नसराईमुळे वाढलेली मागणी यामुळे सोन्याच्या दराने विक्रमी भरारी घेतली आहे. पौष महिना सरताच आता लग्नसराईला जोरदार सुरुवात झाली आहे. मात्र, लग्नसराईची धामधूम वाढत असतानाच सोन्याच्या वाढत्या दरांनी सामान्यांचे बजेट कोलमडले आहे. ऐन लग्नसराईत सोन्याचा भाव उच्चांक गाठल्याने दागिन्यांच्या खरेदीवर मोठा आर्थिक भार पडत आहे. त्यामुळे मध्यमवर्गीयांना सोन्याच्या खरेदीत काटकसर करावी लागणार आहे. जागतिक बाजारात सुरू असलेल्या उलथापालथीमुळे सुरक्षित गुंतवणुकीकडे ओढा वाढला आहे. आजचे सोन्याचे दर पाहायचे झाले तर भारतीय बाजारपेठेत सोन्याच्या दराने चांगलीच भरारी घेतली आहे. आज 29 जानेवारीला प्रति 10 ग्रॅमनुसार 24 कॅरेट सोन्याचा दर 1.78 लाख ते 1.80 लाख रुपयांपर्यंत पोहचला आहे. तसेच काही ठिकाणी हाच दर 1.81 लाखांच्या घरात पोहोचला आहे. त्यामुळे आता 50-60 हजारांत मिळणाऱ्या तोळ्यासाठी लाखात पैसे मोजावे लागणार आहेत. तसेच 5 तोळ्यांचे दागिने बनवण्यासाठी आता किमान 9 ते 10 लाख रुपये खिशात असायला हवे. त्यामुळे जर तुम्ही लग्नासाठी सोने खरेदीकडे वळणार असाल तर तुमचे कंबंरडे चांगलेच मोडणार आहे.

 हेही वाचा- Ajit Pawar Last Call: “किरण, मला आता या सगळ्याचा कंटाळा आलाय..." अपघातापूर्वी दादांनी मित्राजवळ केलं होतं मन मोकळं
सोन्याच्या दरात सातत्याने होणाऱ्या वाढीमागील एक्सपर्टनी काही कारणे सांगितली आहेत. त्यानुसार पहिलं कारण म्हणजे, ट्रम्प यांच्या टॅरिफ धमक्या, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कॅनडाला 100 टक्के टॅरिफ लावण्याची धमकी दिली आहे. एवढचं नव्हे तर फेडरल रिझर्व्हने चलनविषयक धोरणात केलेली शिथिलता याकडे तज्ज्ञांचे लक्ष वेधले आहे. अमेरिकन फेडरल रिझर्व्ह आगामी काळात व्याजदरात दोनवेळा कपात करण्याची शक्यता आहे. अमेरिकेत व्याजदरात झालेल्या कपातीमुळे 2026 पर्यंत सोन्याची किंमत प्रति औंस 5,000 डॉलर्सच्या पुढे जाण्याचा अंदाज आहे. यामुळे व्याजदर कमी झाल्यास गुंतवणुकीत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. जेव्हा व्याजदर कमी होतात, तेव्हा बाँड्समधील परतावा घटतो. तसेच डॉलर कमकुवत झाल्याने सोने खरेदी करणे अधिक स्वस्त होते यामुळे गुंतवणूकदार सोन्याकडे वळतात. तसेच US-NATO मधील ग्रीनलैंड विवाद आणि वेनेझुएलाच्या राष्ट्राध्यक्षांना झालेली अटक यामुळे जागतिक बाजारपेठेत अस्थिरता निर्माण झाली आहे. 


सम्बन्धित सामग्री





ताज्या बातम्या




ताज्या बातम्या