Saturday, February 14, 2026 02:57:59 AM

Gold-Silver Price Today : सोने-चांदीच्या आजच्या दरांनी बाजारात खळबळ; चांदी स्वस्त? सोन्याचे दर चढ-उतारासह...

गेल्या काही दिवसांपासून सोने-चांदीच्या दरात मोठी अस्थिरता निर्माण झाली असून, गुंतवणूकदारांचे लक्ष आता एका वेगळ्या धातूने वेधून घेतले आहे. सोन्याचे भाव गेल्या काही दिवसांपासून गगनाला भिडलेत.

gold-silver price today  सोने-चांदीच्या आजच्या दरांनी बाजारात खळबळ चांदी स्वस्त सोन्याचे दर चढ-उतारासह

गेल्या काही दिवसांपासून सोने-चांदीच्या दरात मोठी अस्थिरता निर्माण झाली असून, गुंतवणूकदारांचे लक्ष आता एका वेगळ्या धातूने वेधून घेतले आहे. सोन्याचे भाव गेल्या काही दिवसांपासून गगनाला भिडलेत. भारतीय बाजारात सोन्याच्या दरात मोठा फेरबदल झाल्याचे पाहायला मिळाले आहे. जर तुम्ही सोन्यात गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर आज सोन्याचे दर जाणून घ्या... देशात प्रति ग्रॅमच्या दरानुसार, आज 5 फेब्रुवारी 2026 रोजी भारतातील सोन्याच्या भावात मोठी घसरण दिसून आली आहे. 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम सुमारे 1,51,529 रुपये ते 1,58,360 रुपयांच्या दरम्यान आहे, तर 22 कॅरेट सोने अंदाजे 14,155 प्रति ग्रॅम आणि प्रति 10 ग्रॅम 1,41,550 दराने विकले जात आहे. महाराष्ट्रात 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम सुमारे 1,44,543 आहे. 

हेही वाचा- Stock Market Today: सेन्सेक्स 83 हजारांच्या खाली? निफ्टीही गडगडला; वाचा शेअर बाजारातील पडझडीचे नेमके कारण काय?
जाणून घ्या शहरानुसार सोन्याचे दर कसे आहेत?
5 फेब्रुवारी 2026 रोजी महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये सोन्याचे दर 24 कॅरेटसाठी प्रति 10 ग्रॅम अंदाजे 1,54,000 ते 1,75,000 च्या दरम्यान आहेत. मुंबईत प्रति 10 ग्रॅमनुसार 24 कॅरेट सोन्याचा दर 1,75,340 आणि 22 कॅरेट सोनं हे 1,60,000च्या दरात आहे. तर नाशिकमध्ये प्रति 10 ग्रॅमनुसार 24 कॅरेट सोन 1,54,020 तर 22 कॅरेट सोन 1,41,190 च्या दरात आहे. पुणे आणि नागपुरात सोन्याचे दर चढाव-उतारासह उच्च पातळीवर आहेत. पुण्यात प्रति 10 ग्रॅमनुसार 24 कॅरेट सोन 1,73,157 तर 22 कॅरेट 1,58,733 रुपयांच्या दरात आहे. तसेच नागपूरमध्ये प्रति 10 ग्रॅमनुसार 24 कॅरेट 1,72,758 इतके तर 22 कॅरेट 1,58,367 रुपयांच्या दरात आहे. 


सम्बन्धित सामग्री





ताज्या बातम्या




ताज्या बातम्या