Sunday, November 16, 2025 06:41:49 PM

Google Chrome Warning: गुगल क्रोम यूजर्ससाठी धोक्याची घंटा! एका क्लिकने होऊ शकतो डेटा चोरी आणि सिस्टिम हॅक

गुगल क्रोम वापरणाऱ्यांसाठी मोठा इशारा जारी! CERT-In ने सायबर हल्ल्याचा धोका व्यक्त केला आहे. जुन्या व्हर्जनमधील त्रुटींमुळे डेटा चोरी आणि मालवेअर हल्ल्याची शक्यता वाढली आहे.

google chrome warning गुगल क्रोम यूजर्ससाठी धोक्याची घंटा एका क्लिकने होऊ शकतो डेटा चोरी आणि सिस्टिम हॅक

Google Chrome Warning: गुगल क्रोमचा वापर आज जवळजवळ प्रत्येक इंटरनेट यूजर करताना दिसतो. मोबाईलपासून ते लॅपटॉपपर्यंत हा ब्राउजर लाखो लोकांच्या दैनंदिन वापराचा भाग बनला आहे. पण आता या लोकप्रिय ब्राउजरबाबत एक गंभीर इशारा समोर आला आहे. भारत सरकारच्या इंडियन कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम (CERT-In) ने गूगल क्रोम यूजर्सना “हाय रिस्क” अलर्ट जारी केला आहे.

अलीकडेच क्रोमच्या काही व्हर्जनमध्ये अशा तांत्रिक त्रुटी आढळल्या आहेत, ज्यामुळे हॅकर्सना वापरकर्त्यांचा डेटा चोरी करण्याची आणि सिस्टिममध्ये मालवेअर इन्स्टॉल करण्याची संधी मिळू शकते. या त्रुटींमुळे सायबर अटॅकचा धोका वाढला असून, काही प्रकरणांत पूर्ण सिस्टिम क्रॅश होण्याचाही धोका निर्माण झाला आहे.

हेही वाचा: AI Features in Instagram : इन्स्टाग्राम स्टोरीजमध्ये आता 'Meta AI' ची जादू! टेक्स्ट कमांड्स देऊन फोटो-व्हिडिओ एका झटक्यात बदला

CERT-In ने दिलेल्या माहितीनुसार, या सुरक्षा दोषाला CVE-2025-12036 या कोडने ओळखण्यात आले आहे. ही कमतरता विशेषतः V8 JavaScript इंजिनमध्ये असल्याचे समजते, जे क्रोमच्या कामकाजाचा एक महत्त्वाचा भाग आहे. या त्रुटीचा गैरफायदा घेत हॅकर्स वापरकर्त्यांना धोकादायक वेबसाइट्सवर रिडायरेक्ट करू शकतात. अशा वेबसाइट्समधून ते वापरकर्त्यांच्या संगणकात घुसखोरी करून त्यांच्या फाइल्स, पासवर्ड, बँकिंग माहिती आणि इतर संवेदनशील डेटा हाती घेऊ शकतात.

विशेष म्हणजे, Windows, macOS आणि Linux ऑपरेटिंग सिस्टम वापरणारे जे यूजर्स क्रोमच्या जुन्या आवृत्तीवर काम करत आहेत, त्यांना सर्वाधिक धोका आहे. CERT-In च्या अहवालानुसार, 41.0.7390.122/.123 पेक्षा जुने व्हर्जन वापरणाऱ्यांवर सायबर हल्ल्याची शक्यता जास्त आहे.

सध्याच्या घडीला गूगलने या त्रुटी दूर करण्यासाठी नवीन सिक्युरिटी पॅचेस जारी केले आहेत. त्यामुळे वापरकर्त्यांनी तातडीने आपला ब्राउजर अपडेट करणे अत्यावश्यक आहे.

हेही वाचा:Mukesh Ambani Deal with Facebook : मुकेश अंबानी यांचा मोठा निर्णय! AI क्षेत्रात फेसबुकसोबत नवा करार

क्रोम अपडेट करण्याची पद्धतही सोपी आहे: 

  1. सर्वप्रथम क्रोम ओपन करा.

  2. वरच्या उजव्या बाजूला असलेल्या थ्री डॉट्स वर क्लिक करा.

  3. 'Help' आणि नंतर 'About Google Chrome' या पर्यायांवर जा.

  4. जर कोणतेही अपडेट उपलब्ध असेल, तर ते लगेच इन्स्टॉल करा आणि ब्राउजर रीस्टार्ट करा.

तज्ञांच्या मते, नियमित अपडेट्स केल्यास अशा प्रकारच्या सायबर जोखमींपासून बचाव होऊ शकतो. अनोळखी वेबसाइट्सवर क्लिक करणे, संशयास्पद लिंक उघडणे किंवा अज्ञात फाइल्स डाउनलोड करणे टाळणेही आवश्यक आहे.

गेल्या काही महिन्यांत सायबर हल्ल्यांचे प्रमाण झपाट्याने वाढले आहे. त्यामुळे डिजिटल जगात सुरक्षित राहण्यासाठी सावधानता आणि जागरूकता हीच सर्वोत्तम शस्त्रं ठरतात.


सम्बन्धित सामग्री