Sunday, March 08, 2026 01:04:18 PM

AI Impact Summit : भारतात AI चा नवा अध्याय! सरकारने जाहीर केली 7 सूत्री मार्गदर्शक तत्त्वे, कसे असेल देशातील तंत्रज्ञानाचे भविष्य?

सरकारने एआयच्या वापरासाठी सात प्रमुख तत्त्वे किंवा 'सूत्रे' निश्चित केली आहेत. ही सूत्रे आरोग्य, शिक्षण, शेती आणि वित्त अशा सर्व क्षेत्रांत एआयच्या वापरासाठी दिशादर्शक ठरतील.

ai impact summit  भारतात ai चा नवा अध्याय सरकारने जाहीर केली 7 सूत्री मार्गदर्शक तत्त्वे कसे असेल देशातील तंत्रज्ञानाचे भविष्य

India AI Governance Guidelines : भारत सरकारने कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) क्षेत्रासाठी आपली पहिलीवहिली सर्वसमावेशक 'गव्हर्नन्स गाईडलाईन्स' (नियमावली) जाहीर केली आहे. 'एआय इम्पॅक्ट समिट 2026' च्या मुहूर्तावर घेतलेला हा निर्णय भारताला जागतिक स्तरावर 'रिस्पॉन्सिबल एआय' (जबाबदार एआय) चा नेता म्हणून प्रस्थापित करणारा ठरेल.

7 सूत्रे: एआय गव्हर्नन्सचा मुख्य आधार
सरकारने एआयच्या वापरासाठी सात प्रमुख तत्त्वे किंवा 'सूत्रे' निश्चित केली आहेत. ही सूत्रे आरोग्य, शिक्षण, शेती आणि वित्त अशा सर्व क्षेत्रांत एआयच्या वापरासाठी दिशादर्शक ठरतील:
भरोसा (Trust): कोणत्याही तांत्रिक प्रगतीसाठी लोकांचा विश्वास हा पाया असावा.
पीपल फर्स्ट (People First): तंत्रज्ञान हे मानवी निर्णय प्रक्रिया अधिक सक्षम करण्यासाठी असावे, मानवाचा पर्याय म्हणून नाही.
पाबंदीपेक्षा नाविन्य (Innovation over Restraint): नवनवीन प्रयोगांना अटकाव करण्याऐवजी त्यांना योग्य दिशा देण्यावर भर.
निष्पक्षता आणि समानता (Fairness & Equity): एआय सिस्टीममुळे कोणत्याही प्रकारचा भेदभाव होणार नाही याची खात्री करणे.
जबाबदारी (Accountability): गैरवापर झाल्यास जबाबदारी निश्चित करण्यासाठी स्पष्ट यंत्रणा.
पारदर्शक डिझाइन (Understandable by Design): एआय सिस्टीम नेमकी कशी काम करते, हे सर्वसामान्यांना समजण्यासारखे असावे.
सुरक्षा आणि स्थिरता (Safety & Sustainability): तंत्रज्ञान हे सुरक्षित आणि पर्यावरणाला पूरक असावे.

हेही वाचा - Ahmedabad Plane Crash: 'देशाच्या तपास यंत्रणांवर विश्वास ठेवा...'; अहमदाबाद विमान अपघाताबाबत परदेशी माध्यमांचे दावे सरकारने फेटाळले

स्वतंत्र कायद्याऐवजी 'लवचिक' धोरण
सरकारने स्पष्ट केले आहे की, सध्या एआयसाठी कोणत्याही स्वतंत्र कायद्याची आवश्यकता नाही. सध्याचा डेटा प्रोटेक्शन कायदा आणि आयटी नियम (IT Rules) यांमार्फतच जोखीम व्यवस्थापन केले जाईल. मात्र, 'हाय-रिस्क' (जास्त जोखीम असलेल्या) एआय ॲप्लिकेशन्सवर कडक नजर ठेवली जाईल आणि अशा ठिकाणी मानवी देखरेख अनिवार्य असेल. तंत्रज्ञानातील बदलांनुसार वेळोवेळी या नियमांमध्ये सुधारणा केली जाईल.

तीन नवीन संस्थांची होणार स्थापना
या मार्गदर्शक तत्त्वांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आणि देखरेखीसाठी तीन नवीन संस्था स्थापन करण्याचा प्रस्ताव आहे:
1. AI गव्हर्नन्स ग्रुप: विविध मंत्रालयांमध्ये धोरणात्मक समन्वय साधण्याचे काम करेल.
2. तंत्रज्ञान आणि धोरण तज्ज्ञ समिती: तज्ज्ञांच्या सल्ल्याने एआयमधील तांत्रिक बदलांवर लक्ष ठेवेल.
3. AI सेफ्टी इन्स्टिट्यूट: एआय प्रणालींचे टेस्टिंग, सुरक्षा संशोधन आणि धोक्यांचे विश्लेषण (Risk Assessment) करण्यासाठी ही संस्था महत्त्वाची ठरेल.

'विकसित भारत 2047' कडे मोठे पाऊल
या धोरणामुळे भारताची प्रतिमा केवळ एआय तंत्रज्ञान वापरणारा देश म्हणून नाही, तर हे तंत्रज्ञान सुरक्षितपणे जगासमोर मांडणारा देश म्हणून निर्माण होईल. 'दिल्ली डिक्लेरेशन' आणि 16 फेब्रुवारी 2026 पासून सुरू होणाऱ्या पाच दिवसीय 'एआय इम्पॅक्ट समिट' मुळे भारताचा आवाज जागतिक स्तरावर अधिक बुलंद होईल. एआयची ताकद केवळ काही मोजक्या कंपन्यांच्या हातात न राहता ती 'एआय फॉर ऑल' (AI for All) या ध्येयाने सर्वांपर्यंत पोहोचावी, हाच यामागील मूळ उद्देश आहे.

हेही वाचा - Indian Army Short Film: अमिताभ बच्चन यांचा तो पहाडी आवाज अन् भारतीय सेनेचे शौर्य; 'भैरव' लघुपट पाहून तुमचा ऊर अभिमानाने भरून येईल


सम्बन्धित सामग्री