Saturday, October 12, 2024 08:40:58 PM

Mumbai Ganesha Visarjan
राजभवन येथील गणरायाचे कृत्रिम हौदात विसर्जन

राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्या निवासस्थानी, राजभवन येथे स्थापन केलेल्या गणरायाचे बुधवारी गणेशोत्सवाच्या पाचव्या दिवशी राजभवन येथे कृत्रिम हौदात विसर्जन करण्यात आले.

राजभवन येथील गणरायाचे कृत्रिम हौदात विसर्जन

मुंबई : राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्या निवासस्थानी, राजभवन येथे स्थापन केलेल्या गणरायाचे बुधवारी गणेशोत्सवाच्या पाचव्या दिवशी राजभवन येथे कृत्रिम हौदात विसर्जन करण्यात आले. राज्यपालांनी कुटुंबातील सदस्य तसेच  राजभवनातील अधिकारी व कर्मचारी यांचेसह गणरायाची आरती केल्यानंतर बाप्पाला निरोप दिला. राज्यपालांच्या सूचनेनुसार गणेश मूर्तीचे समुद्रात विसर्जन न करता कृत्रिम हौदात विसर्जन करण्यात आले. गणेशमूर्ती विसर्जन करताना पाणी प्रदूषित होऊ नये यासाठी मूर्तीचे समुद्रात विसर्जन न करता ते कृत्रिम हौदात करावे अशी सूचना राज्यपालांनी केल्यामुळे मूर्तीचे विसर्जन हौदात करण्यात आले.

शाडूची मूर्ती; नाशिक मध्यवर्ती कारागृहातील कैद्यांकडून निर्मिती 

राज्यपालांच्या निवासस्थानी मांडलेली गणेशाची मूर्ती शाडूची होती व ही मूर्ती नाशिक येथील कारागृहातील कैद्यांनी तयार केली होती.  नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या संकल्पनेनुसार ही मूर्ती राज्यपालांना देण्यात आली होती. विसर्जनाचे वेळी राज्यपालांचे प्रधान सचिव प्रविण दराडे, सहसचिव श्वेता सिंघल, परिवार प्रबंधक जितेंद्र वाघ तसेच इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. 


सम्बन्धित सामग्री






jaimaharashtranews-logo