Friday, June 13, 2025 06:17:19 PM

पानसरे हत्या, डॉ. वीरेंद्र तावडेचा जामीन रद्द

गोविंद पानसरे हत्येप्रकरणी संशयित आरोपी डॉ. वीरेंद्र तावडे याचा जामीन जिल्हा व सत्र न्यायालयाने रद्द केला.

पानसरे हत्या डॉ वीरेंद्र तावडेचा जामीन रद्द

कोल्हापूर : गोविंद पानसरे हत्येप्रकरणी संशयित आरोपी डॉ. वीरेंद्र तावडे याचा जामीन जिल्हा व सत्र न्यायालयाने रद्द केला. जामीन रद्द केला असल्यामुळे तावडे याला तातडीने ताब्यात घ्यावे असा आदेश न्यायाधीश एस. एस. तांबे यांनी दिली. तावडेवर हत्येचा कट रचणे, हल्लेखोरांना प्रशिक्षण देणे, शस्त्रे आणि वाहने पुरवणे, हल्लेखोरांच्या राहण्याची व्यवस्था करणे ही कामं केल्याचा आरोप आहे. 


सम्बन्धित सामग्री