गोंदिया : गोदिंया जिल्ह्यातील ग्रामसेवकाने दारूच्या नशेत एका महिलेशी असभ्य वर्तन केले. या वर्तनामुळे गावकऱ्यांनी त्याला चांगलीच अद्दल घडवली. नवरगाव येथील ग्रामसेवक लोकमान्य चौधरी याने दारुच्या नशेत एका महिलेच्या घरात जावून तिचा हात पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र महिलेनं आरडाओरड करताच कुटुंबीय आणि गावकरी धावत आले. त्यानंतर ग्रामसेवकाला विद्युत खांबाला बांधून चांगलाच चोप दिला. दरम्यान पोलिसांनी मध्यस्थी करत त्याला ग्रामस्थांच्या तावडीतून सोडवलं. मात्र अद्यापही त्या ग्रामसेवकाविरोधात तक्रार करण्यात आली नसल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे.