Tuesday, November 18, 2025 03:16:22 AM

हार्दिक आणि माहिका यांच्यातली केमेस्ट्री.. दोघे मिळून कार धूत असल्याचा व्हिडिओ केला शेअर

व्हिडिओमध्ये हार्दिक त्याची कार एका कपड्याने स्वच्छ करताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये हार्दिक आणि माहिका शर्मा एकत्र दिसत आहेत.

हार्दिक आणि माहिका यांच्यातली केमेस्ट्री दोघे मिळून कार धूत असल्याचा व्हिडिओ केला शेअर

Cricket Star Hardik Pandya Shares Photos and Video with Mahieka Sharma : भारतीय क्रिकेट संघाचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या (Hardik Pandya) सध्या दुखापतीमुळे क्रिकेटच्या मैदानापासून दूर असला तरी, तो त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे जोरदार चर्चेत आहे. गेल्या काही दिवसांपासून हार्दिक आणि अभिनेत्री माहिका शर्मा (Mahika Sharma) यांच्या डेटिंगच्या चर्चांवर आता शिक्कामोर्तब झाले असून, हार्दिकने स्वतः इंस्टाग्रामवर या दोघांचा एक नवीन व्हिडिओ शेअर करून त्यांच्या नाते एकप्रकारे जगजाहीरच केले आहे.

माहिकाच्या Kiss मुळे व्हिडिओ व्हायरल
हार्दिक पांड्याने इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या या खास व्हिडिओमुळे ते रिलेशनशिपमध्ये असल्याची बाब आता अगदी पक्की झाली आहे. या व्हिडिओमध्ये हार्दिक आणि माहिका शर्मा एकत्र दिसत आहेत, आणि विशेष म्हणजे, एका क्षणी माहिका शर्मा हार्दिक पांड्याला गालावर किस (Kiss) करताना दिसत आहे, ज्यामुळे हा व्हिडिओ सध्या खूप व्हायरल होत आहे आणि त्याने सर्वांचे लक्ष वेधले आहे.

कार धुण्याचा रोमँटिक क्षण: व्हिडिओमध्ये हार्दिक त्याची कार एका कपड्याने स्वच्छ करताना दिसत आहे. माहिका शर्माच्या हातात पाण्याचा पाईप आहे आणि ती कार धुण्यासाठी थांबलेली आहे. हार्दिक तिच्या जवळ येतो आणि त्याच वेळी माहिका त्याला गालावर किस करते. यानंतर हार्दिक पुन्हा गाडी धुण्यास सुरुवात करतो. साबण आणि डिटर्जंटने कार स्वच्छ झाल्यावर तो माहिकाला गाडीवर पाणी टाकण्यास सांगतो.

इतर फोटो आणि पुनरागमनाची तयारी
हा व्हिडिओ हार्दिक पांड्याने शेअर केलेल्या अनेक पोस्ट्सपैकी एक आहे. त्याने या व्हिडिओसोबत इतर अनेक फोटो आणि व्हिडिओ देखील शेअर केले आहेत. एका फोटोमध्ये हार्दिक आणि माहिका पाण्यात असतानाचा रोमँटिक फोटो आहे, तर दुसरा व्हिडिओ त्यांच्या रोड ट्रिपचा आहे. हे सर्व फोटो आणि व्हिडिओ एकाच वेळचे नसून वेगवेगळ्या दिवसांचे आहेत, पण दोघांची जवळीक स्पष्ट दर्शवतात.

दरम्यान, हार्दिक पांड्या सध्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या एकदिवसीय (ODI) मालिकेतून भारतीय संघात पुनरागमन करण्यासाठी सज्ज आहे. तो संघाचा एक महत्त्वाचा अष्टपैलू खेळाडू असून, त्याने आपल्या दमदार कामगिरीने संघाच्या विजयात मोठी भूमिका बजावली आहे. आशिया चषक स्पर्धेत खेळताना त्याला दुखापत झाली होती, ज्यामुळे तो अंतिम सामन्यातही खेळू शकला नव्हता.


सम्बन्धित सामग्री