IND W vs SA W World Cup 2025 Final : आयसीसी महिला एकदिवसीय विश्वचषक (ICC Women's ODI World Cup) स्पर्धेच्या महाअंतिम सामन्यात भारत महिला (India Women) आणि दक्षिण आफ्रिका महिला (South Africa Women) संघ रविवारी 2 नोव्हेंबर रोजी नवी मुंबईतील डी. वाय. पाटील स्टेडियमवर एकमेकांविरुद्ध लढणार आहेत. वर्ल्ड कपसाठी होणाऱ्या या कडव्या चढाओढीपूर्वीच, टीम इंडियाची कॅप्टन बदलण्यात आली की काय, असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे! पण हा प्रश्न का पडला आहे? पाहा हा व्हिडिओ
जेमिमा रॉड्रिग्सने केली 'कॅप्टन'ची घोषणा
टीम इंडियाची कॅप्टन हरमनप्रीत कौरला (Harmanpreet Kaur) धक्का बसला नसून, टीम इंडियाच्या मीटिंगमध्ये एक अत्यंत उत्साही चिमुकली टीमसोबत आली होती. खेळाडू जेमिमा रॉड्रिग्सने (Jemimah Rodrigues) मजेत तिला टीम इंडियाची कॅप्टन म्हणून घोषित केले. खुद्द हरमनप्रीत कौरने सांगितले की, राष्ट्रगीत (National Anthem) संपताच ती चिमुकली माझ्या जवळ आली आणि 'मी तुम्हाला मिठी मारू शकते का?' असे तिने विचारले.
हरमनप्रीत कौरने त्या चिमुकलीला 'हो' म्हटल्यानंतर तिने असे काहीतरी म्हटले, ज्यामुळे हरमनप्रीत आश्चर्यचकित झाली आणि एकदम खूश झाली. चिमुकलीचे वाक्य ऐकून हरमनप्रीतने तिला सर्व टीमसमोर ते पुन्हा बोलण्यास सांगितलं. तेव्हा ती चिमुकलीही लगेच तयार झाली.
हेही वाचा - Sikandar Shaikh: महाराष्ट्र केसरी किताब पटकवणाऱ्या सिकंदर शेखला अटक, राजस्थानातील कुख्यात टोळीशी संबंध
चिमुकलीच्या शब्दांनी वाढवला उत्साह
त्या चिमुकलीने "ऑस्ट्रेलिया नक्कीच चांगली खेळली, पण टीम इंडिया नक्कीच ऑस्ट्रेलियापेक्षा चांगली खेळली," असे आत्मविश्वासाने सांगितले. तिचे हे वाक्य ऐकून सर्व खेळाडूंचा उत्साह (Excitement) वाढला.
"मला खूप आनंद झाला!"
या चिमुकलीने खेळाडूंशी बोलताना आपला आनंद व्यक्त केला. ती म्हणाली, "टीम इंडियाची कामगिरी पाहून मला आश्चर्य वाटलं. मी कधी संपूर्ण संघासोबत बोलू शकेन आणि त्यांना भेटू शकेन, असं मला वाटलं नव्हतं. सर्व खेळाडू मला भेटले, त्यामुळे मला खूप आनंद झाला आहे." टीम इंडियाच्या खेळाडूंसोबत संवाद साधताना तिच्या चेहऱ्यावरचा आनंद ओसंडून वाहत होता.
फायनलसाठी राखीव दिवस
दरम्यान, भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील हा अंतिम सामना जर रविवारी पावसामुळे थांबवावा लागला, तर त्यासाठी सोमवार (Reserved Day) राखीव ठेवण्यात आला आहे. मात्र, सोमवारीही 50 टक्क्यांहून अधिक पावसाची शक्यता असल्याने, अंपायर्सचा प्रयत्न हा सामना रविवारीच पूर्ण करण्याचा असेल, जरी त्यासाठी ओव्हर कमी (Overs Reduction) करावी लागली तरी.
हेही वाचा - Jemimah Rodrigues : REEL मुळे ट्रोल, चिंतेने ग्रस्त, रोजचा दिवस रडून जाई...तरीही भारतासाठी खेचून आणला विजय, जाणून घ्या जेमिमाची Comeback Story