Sunday, May 18, 2025 03:50:47 PM

हर्षवर्धन पाटलांना इंदापूर मतदारसंघातून उमेदवारी

राशपकडून हर्षवर्धन पाटील यांना इंदापूर विधानसभा मतदारसंघामधून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

हर्षवर्धन पाटलांना इंदापूर मतदारसंघातून उमेदवारी

इंदापूर : हर्षवर्धन पाटील यांनी भाजपा सोडून शरद पवारांच्या राशपमध्ये प्रवेश केला. इंदापूरमध्ये पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम झाला. यानंतर थोड्याच वेळात राशपकडून हर्षवर्धन पाटील यांना इंदापूर विधानसभा मतदारसंघामधून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. 

हर्षवर्धन यांनी राशपमध्ये प्रवेश केला त्यावेळी राशप प्रमुख शरद पवार, जयंत पाटील, सुप्रिया सुळे, अमोल कोल्हेंसह अनेक नेते उपस्थित होते. हर्षवर्धन पाटील आणि त्यांच्या शेकडो कार्यकर्त्यांनी राशपमध्ये प्रवेश केला. हर्षवर्धन पाटील यांच्या निर्णयामुळे पश्चिम महाराष्ट्रात भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन पक्षांना फटका बसण्याची शक्यता आहे. 

हर्षवर्धन पाटलांना इंदापूर विधानसभा मतदारसंघामधून उमेदवारी जाहीर झाल्यामुळे राशपमध्ये नाराजीचे वातावरण आहे. 'सोनाई'चे संचालक प्रवीण माने यांनी कार्यकर्त्यांसोबत चर्चा लवकरच पुढील निर्णय घेणार असल्याचे संकेत दिले आहेत. 


सम्बन्धित सामग्री