छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरमध्ये मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या हाता तोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावला आहे. फुलंब्री, मादनी, खुपटा, जळकी, भोरखेडा या भागातील सोयाबीन, मका आणि कपाशीसारखी पिके जमीन दोस्त झाली आहेत. सोयाबीन आणि मका पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.काही ठिकाणी पिकांमध्ये पाणी साचल्याने पिक पूर्णपणे भुई सपाट झाल्याचे चित्र आहे.