Wednesday, November 19, 2025 04:30:39 AM

प्रियकराच्या मदतीने पतीची केली हत्या!

कात्रज परिसरात अनैतिक संबंधातून एक धक्कादायक घटना घडली आहे. एका महिलेने आपल्या प्रियकराच्या मदतीने पतीचा गळा दाबून खून केला. त्यानंतर तिने पतीने आत्महत्या केल्याचा बनाव केला.

प्रियकराच्या मदतीने पतीची केली हत्या

पुणे: कात्रज परिसरात अनैतिक संबंधातून एक धक्कादायक घटना घडली आहे. एका महिलेने आपल्या प्रियकराच्या मदतीने पतीचा गळा दाबून खून केला. त्यानंतर तिने पतीने आत्महत्या केल्याचा बनाव केला. परंतु महिलेने प्रियकराच्या मदतीने खून केल्याचे तपासात समोर आले. त्यानंतर भारती विद्यापीठ पोलिसांनी दोघांना अटक केली. गोपीनाथ इंगुळकर (वय ३७) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. या प्रकरणी त्याची पत्नी राणी इंगुळकर (वय ३२) आणि तिचा प्रियकर नितीन ठाकर (वय ४५) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत.

गोपीनाथ मार्केट यार्डात हमालीचे काम करत होते, तर त्यांची पत्नी राणी वसतिगृहात काम करत होती. राणी आणि नितीन यांच्यात अनैतिक संबंध होते, आणि गोपीनाथ त्यांच्या संबंधात अडथळा ठरत होता. रविवारी रात्री गोपीनाथ झोपेत असताना राणी आणि तिच्या प्रियकराने त्याचा गळा दाबून खून केला. नंतर राणीने पोलिसांना पतीने आत्महत्या केल्याचे सांगितले. पण शवविच्छेदन अहवालातून खुनाचा प्रकार उघडकीस आला आणि पोलिसांनी दोघांना अटक केली. तसेच, कर्वेनगरमध्येही अनैतिक संबंधातून अशाच प्रकारचा खून घडल्याचे समोर आले आहे. महिलेने पतीला जेवणात झोपेच्या गोळ्या दिला. गुंगी आल्यानंतर प्रियकराने पतीवर वार करून त्याचा खून केला होता.


सम्बन्धित सामग्री