मुंबई - हिमाचल प्रदेश विधानसभेत काँग्रेसच्या मंत्र्यांनी राज्यात मुसलमान घुसखोरीबाबत चिंता व्यक्त केली आहे. "हे बांगलादेशी कुठून येत आहेत?" या बांगलादेशी घुसखोरांना राज्यातून हाकलून लावण्याची मागणी केली आहे. राज्यातील वाढत्या घुसखोरीमुळे सामाजिक आणि धार्मिक तणाव वाढत असल्याचे काँग्रेसने विधानसभेत मांडले. देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी तातडीने हस्तक्षेप करण्याचे आवाहन केले आहे. यामुळे हिमाचल प्रदेशातील राजकीय वातावरण आणखी तापले असून, या विषयावर विधानसभेत तीव्र चर्चाही झाली आहे.
हिमाचल प्रदेशातलया मुसलमानांवरील वादाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस मंत्र्यांनी देशाचे गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे. सिमला जिल्ह्यात मुसलमानांमुळे होणाऱ्या वादावर काँग्रेसने गंभीर चिंता व्यक्त केली आहे. काँग्रेस मंत्र्यांच्या आरोपानुसार, काही शक्ती धार्मिक ताणतणाव निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत, ज्यामुळे प्रदेशातील शांतता आणि सुरक्षेला धक्का बसू शकतो.
काँग्रेसने गृहमंत्री अमित शाह यांना आवाहन केले आहे की, या प्रकरणात तातडीने कारवाई करून निःपक्षपाती तपास केला जावा. यामुळे राज्यात पसरलेल्या असंतोषाचे वारे कमी होईल आणि परिस्थिती नियंत्रणात येईल. काँग्रेसच्या या मागणीमुळे हिमाचल प्रदेशात राजकीय वातावरण आणखी तापले आहे. राज्यातील धार्मिक आणि सामाजिक वातावरणावर परिणाम होण्याची शक्यता आहे.