Tuesday, December 10, 2024 11:06:16 AM

Heena Gavit's resignation from BJP
हीना गावित यांचा भाजपाला रामराम

नंदुरबार जिल्ह्यात भाजपाला धक्का बसला आहे.

हीना गावित यांचा भाजपाला रामराम


नंदुरबार : नंदुरबार जिल्ह्यात भाजपाला धक्का बसला आहे. अक्कलकुवा आक्रनी मतदारसंघात हीना गावित यांनी बंडखोरी केली आहे. हीना गावित यांनी पक्षाकडे राजीनामा पाठवला आहे. राजीनामा देत भाजपाला रामराम ठोकला आहे. अक्कलकुवा आक्रनी मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढवत असल्यामुळे राजीनामा देत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. अपक्ष उमेदवारीमुळे पक्षाला अडचण होऊ नये म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केल्याचेही हीना गावित यांनी म्हटले आहे.  अक्कलकुवा आक्रनी मतदारसंघात शिवसेना भाजपा विरोधात काम करत असल्याने अपक्ष निवडणूक लढवत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर हीना गावितांचा राजीनामा भाजपाला मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे. 

 

 

 

 

 


 


सम्बन्धित सामग्री






jaimaharashtranews-logo