मुंबई : हिंदू योग्यवेळी अपमानाचा बदला घेतील, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. त्यांनी सूचक शब्दात राहुलना इशारा दिल्याची चर्चा या निमित्ताने राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. लोकसभेत राहुलनी हिंदू हिंसाचार करतात असे वक्तव्य केले होते. या वक्तव्याचा अनेकांनी जाहीर निषेध केला आहे. आता मुख्यमंत्र्यांची या विषयावरील प्रतिक्रिया आली आहे.