हिंगोली : हिंगोली शहरातील प्रगती नगर भागात एका पोलिस कर्मचाऱ्याने आपल्या कौटुंबिक वादातून त्याच्या पत्नी, सासू, मुलगा आणि इतर एक व्यक्तीवर गोळीबार केला. या घटनेमध्ये पोलिस कर्मचाऱ्याची पत्नी मयुरी मोकाडे यांचा जागीच मृत्यू झाला, तर सासू, एक चिमुकलं बाळ आणि इतर एक व्यक्ती गंभीर जखमी झाले आहेत.
२५ डिसेंबर २०२४ रोजी सायंकाळच्या सुमारास हा धक्कादायक प्रकार घडला. पोलिस कर्मचाऱ्याने आपल्या कौटुंबिक वादांमुळे प्रगती नगर येथील सासुरवाडीमध्ये पत्नी आणि सासूवर गोळीबार केला. गोळीबारात पत्नी मयुरी मोकाडे यांचा मृत्यू झाला, तर इतर जखमींमध्ये सासू, चिमुकलं बाळ आणि इतर एक व्यक्ती समाविष्ट आहेत. त्यांना तातडीने हिंगोलीच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु जखमींची स्थिती गंभीर असल्याने त्यांना नांदेड रुग्णालयात हलवले जात आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे घटनास्थळी पोहोचले. पोलीस विभागाने या गंभीर प्रकरणाचा तपास सुरू केला असून आरोपी पोलिस कर्मचाऱ्याला ताब्यात घेतले आहे. कौटुंबिक वादातून झालेल्या या घटनेने हिंगोली शहरात खळबळ माजली आहे.
जय महाराष्ट्र न्यूजच्या थेट संपर्कात राहण्यासाठी व्हॉट्सअप चॅनेल वर क्लिक करा.
या घटनेमुळे हिंगोली शहरात तणाव निर्माण झाला आहे. स्थानिक नागरिकांनी या प्रकारावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे आणि त्या पोलिसावर अधिक कठोर कारवाईची करण्याची मागणी व्यक्त केली जात आहे. पोलीस प्रशासनाने या प्रकरणाचा तपास सुरू केला असून, गोळीबार करण्याच्या कारणांचा खुलासा करण्यासाठी अधिक तपासणी सुरू आहे.