Saturday, July 12, 2025 10:23:30 AM

शिवरायांची वाघनखं साताऱ्यात

छत्रपती शिवाजी महाराजांची ऐतिहासिक वाघनखं सातारा येथे आणण्यात आली आहेत.

शिवरायांची वाघनखं साताऱ्यात

सातारा : छत्रपती शिवाजी महाराजांची ऐतिहासिक वाघनखं सातारा येथे आणण्यात आली आहेत. ही वाघनखं सातारा येथील संग्रहालयात ठेवली जातील. साताऱ्याच्या संग्रहालयात पुढील सात महिने वाघनखं असतील. नागरिक संग्रहालयाला भेट देऊन ऐतिहासिक वाघनखं बघू शकतील. वाघनखांच्या सुरक्षेसाठी संग्रहालयात सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची व्यवस्था आणि पोलीस बंदोबस्त अशी रचना करण्यात आली आहे. 

वाघनखांचा इतिहास

वाघनख हे शिवाजी महाराजांच्या शस्त्रागारात पहिल्यांदा तयार करण्यात आलेले शस्त्र आहे. हे बोटात अंगठीप्रमाणे घालून आणि हाताच्या मुठीत लपवून सोयीनुसार सहजतेने वापरण्याचे प्रभावी शस्त्र आहे. याला वाघाच्या पंज्यावरील नखांप्रमाणे तीक्ष्ण पोलादी टोकं आहेत. मूठ वळल्यावर ती पंजात लपवता येतात. हे ह्त्यार हातामध्ये धारण करून मूठ बंद केल्यावर बोटात दोन अंगठया (तर्जनी-करंगळी घालण्यासारखे दोन अंगठ्या/गोल) घातल्याप्रमाणे दिसते. त्या अंगठया आतील बाजूने एका धातूपट्टीने जोडलेल्या असून त्यावर तीक्ष्ण नखे लावलेली असतात. यांचा उपयोग लक्ष्यावर गुप्तपणे हल्ला चढवण्यासाठी केला जाई. शिवाजी महाराजांनी १० नोव्हेंबर १६५९ रोजी आदिलशाही सरदार अफझल खान याला जावळीच्या युद्धात ठार मारण्यासाठी वाघनखाचा वापर केला होता. 


सम्बन्धित सामग्री