Wednesday, December 11, 2024 12:12:14 PM

Pandharpur
शासकीय महापूजेचा मान विभागीय आयुक्तांना

यंदा आचारसंहिता लागू असल्यामुळे कार्तिकी आषाढीनिमित्त होणाऱ्या शासकीय महापूजेचा मान पुणे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांना देण्यात आला.

शासकीय महापूजेचा मान विभागीय आयुक्तांना

पंढरपूर : कार्तिक शुद्ध एकादशीच्या मुहुर्तावर कार्तिकी यात्रेचा प्रारंभ झाला आहे. पंढरपूरमध्ये विठ्ठल रखुमाईच्या दर्शनाला दोन लाखांपेक्षा जास्त भाविक आल्याची माहिती पोलिसांनी दिली. यंदा आचारसंहिता लागू असल्यामुळे कार्तिकी आषाढीनिमित्त होणाऱ्या शासकीय महापूजेचा मान पुणे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांना देण्यात आला. त्यांच्यासोबत मानाच्या वारकऱ्यांनी महापूजा केली. 

कार्तिकी यात्रा असल्यामुळे वाहतूक नियोजन आणि बंदोबस्तासाठी पंढरपूरमध्ये एक हजार ६२६ पोलिसांची नेमणूक करण्यात आली. अवजड वाहतूक पंढरपूर शहराबाहेरील पर्यायी मार्गांनी वळवण्यात आली आहे. वारकऱ्यांच्या मदतीसाठी सावरकर चौक, शिवाजी चौक, चंद्रभागा वाळवंट, अंबाबाई पटांगण येथे तीर्थक्षेत्र पोलीस मदत केंद्र सुरू करण्यात आली आहेत. वारकऱ्यांना सूचना देण्यासाठी ठिकठिकाणी ध्वनीक्षेपक बसवण्यात आले आहेत. 


सम्बन्धित सामग्री






jaimaharashtranews-logo