Tuesday, January 14, 2025 04:22:12 AM

ATTACK ON DEVEDRA FADNAVIS
'ती' महिला मंत्रालयात घुसलीच कशी ?

देवेंद्र फडणवीस कार्यालय तोडफोड प्रकरणातील 'ती' हल्लेखोर मनोरुग्ण आहे.  मंत्रालयातील घुसखोर महिलेचे कारनामे समोर आले आहेत.

ती महिला मंत्रालयात घुसलीच कशी

२७ सप्टेंबर, २०२४, मुंबई : देवेंद्र फडणवीस कार्यालय तोडफोड प्रकरणातील 'ती' हल्लेखोर मनोरुग्ण आहे.  मंत्रालयातील घुसखोर महिलेचे कारनामे समोर आले आहेत. या महिलेकडून  मंत्रालयातील फडणवीसांच्या कार्यालयाची तोडफोड करण्यात आली. ही महिला आता पोलिसांच्या ताब्यात आहे. या महिलेचं नाव धनश्री सहस्त्रबुद्धे आहे. मुंबईतल्या दादरमधील एका वसाहतीत या महिलेचे वास्तव्य आहे. वसाहतीतील रहिवाशांना चाकूचा धाक दाखवते, घराच्या दारावर झाडूने मारते. सलमान खानबरोबर हिला लग्न करायचं आहे. अनेक राजकीय नेत्यांना ती सातत्याने फोन करुन सलमानचा नंबर मागते. यापूर्वी भाजपा कार्यालयात जाऊनही तिने तमाशा केला होता.  

'ती' महिला मंत्रालयात घुसलीच कशी ?

धनश्रीने २६ सप्टेंबर २४ रोजी सायंकाळी मंत्रालय गाठले. 
मंत्रालय प्रवेशासाठी अनेक प्रवेशद्वार आहेत. 
मंत्रालयाच्या आरसा गेट मधून धनश्रीने प्रवेश केला. 
धनश्रीने आरसा गेटवरील प्रवेश करताना पोलिसांना चकवा दिला. 
धनश्रीचा साहेबी तोरा मंत्रालयात घुसताना पोलिसांना फसवून गेला. 
आरसा गेटवरील पोलिसांकडून चुकारपणा झाला.
धनश्री प्रमाणे सामान्यांना मंत्रालयात सहज प्रवेश मिळत नाही. 
मंत्रालय प्रवेशासाठी आधार कार्ड दाखवावे लागते. 
कामचुकार पोलिसांमुळे धनश्रीने मंत्रालयात धुमाकूळ घातला. 
आता कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवत बेजबाबदार पोलिसांना निलंबित करण्यात आले आहे.


सम्बन्धित सामग्री