Saturday, November 15, 2025 11:03:57 PM

Kedarnath Temple : केदारनाथ मंदिराचे दरवाजे कधी बंद होणार? जाणून घ्या, चारधाम यात्रा कधीपर्यंत सुरू राहणार

चारही धामांच्या मंदिरांचे दरवाजे लवकरच बंद केले जातील. केदारनाथ, बद्रीनाथ, गंगोत्री, यमुनोत्री धामचे दरवाजे बंद होण्याचा शुभ मुहूर्त निश्चित करण्यात आला आहे.

kedarnath temple  केदारनाथ मंदिराचे दरवाजे कधी बंद होणार जाणून घ्या चारधाम यात्रा कधीपर्यंत सुरू राहणार

Chardham Yatra : चारधाम यात्रेमध्ये समाविष्ट असलेली केदारनाथ, बद्रीनाथ, यमुनोत्री आणि गंगोत्री ही पवित्र धामे काही दिवसांतच भाविकांसाठी बंद होणार आहेत. दरवर्षी ही यात्रा केवळ 6 महिने सुरू राहते. आपल्या जीवनकाळात एकदा तरी या पवित्र मंदिरांचे दर्शन घेऊन दैवी आशीर्वाद मिळावा, अशी प्रत्येक हिंदूची इच्छा असते. आता, या चारही धामांच्या मंदिरांचे दरवाजे लवकरच बंद केले जातील. बद्रीनाथ धामचे दरवाजे बंद होण्याचा शुभ मुहूर्त निश्चित करण्यात आला आहे.

चार धाम मंदिरांचे दरवाजे कधी बंद होतील?
उत्तराखंडच्या उंच प्रदेशातील गढवाल हिमालयीन प्रदेशात स्थित या चारही धाम मंदिरांचे दरवाजे हिवाळ्यातील प्रचंड थंडी आणि मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टीमुळे बंद केले जातात.
बद्रीनाथ धाम : शुभ मुहूर्तावर पूजा-अर्चा झाल्यानंतर चमोली जिल्ह्यातील बद्रीनाथ मंदिराचे कपाट 25 नोव्हेंबर रोजी दुपारी 2:56 वाजता बंद करण्यात येणार आहे.
केदारनाथ आणि यमुनोत्री: या दोन्ही मंदिरांचे दरवाजे 23 ऑक्टोबर रोजी दुपारी 12.30 वाजता आणि यमुनोत्री धामचे दरवाजे सकाळी 11.36 वाजता बंद होणार आहेत.
गंगोत्री : गंगोत्री मंदिराचे दरवाजे दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी 22 ऑक्टोबरला बंद होतील. त्यामुळे, जर तुम्ही गंगोत्रीच्या दर्शनाची योजना आखत असाल, तर दिवाळीपूर्वी येथे जाऊ शकता.
या मंदिरांचे दरवाजे आता थेट 2026 मध्ये पुन्हा उघडतील, जी प्रक्रिया पुढील वर्षी एप्रिल-मे महिन्यात सुरू होते.

हेही वाचा - Darjeeling Heavy Rain : दार्जिलिंगमध्ये मुसळधार पावसाने हाहाकार; भूस्खलनासह बालसन नदीवरील पूल कोसळला, 17 मृतदेह ताब्यात

चारधाम यात्रेसाठी नोंदणी आणि प्रवासाची माहिती
नोंदणी आवश्यक: चारधाम यात्रेला जाण्यासाठी थेट प्रवास करता येत नाही. यासाठी तुम्हाला उत्तराखंड पर्यटन विभागाच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन 'चार धाम यात्रा नोंदणी' पर्यायाद्वारे नाव, पत्ता, मोबाइल नंबर आणि ओळखपत्र यांसारखी माहिती भरून नोंदणीकरण करणे आवश्यक आहे.
प्रवासाचा मार्ग: चारधाम यात्रा हरिद्वार मार्गे यमुनोत्री, गंगोत्री, केदारनाथ आणि शेवटी बद्रीनाथ या क्रमाने केली जाते.
यमुनोत्रीला जानकी चट्टी येथून पायी किंवा घोड्यावरून जाता येते.
- केदारनाथला जाण्यासाठी गुप्तकाशीहून सोनप्रयाग आणि गौरीकुंड मार्गे पायी यात्रा करावी लागते.
- गंगोत्री आणि बद्रीनाथ या तीर्थस्थळांपर्यंत थेट रस्त्याने पोहोचता येते.
- तुम्ही हवाई, रस्ते आणि रेल्वे मार्गाने हरिद्वारपर्यंत सहज पोहोचू शकता आणि तिथून पुढे चारधाम यात्रेची सुरुवात करता येते.

हेही वाचा - Priyanka Gandhi On Wayanad Landslide : केंद्राच्या अपुऱ्या मदतीवर प्रियांका गांधींचा संताप; 2,221 कोटींच्या मागणीवर केवळ 260 कोटी मंजूर


सम्बन्धित सामग्री