Monday, November 17, 2025 01:18:07 AM

Gold Jewellery : हौस इतकी मोठी की.. जगात आतापर्यंत जितकं सोनं खाणीतून बाहेर निघालंय, त्यापैकी इतक्या सोन्याचे फक्त दागिनेच बनलेत!

सोन्याच्या उपयुक्ततेमुळे आणि सुंदरतेमुळेच या मौल्यवान धातूविषयी लोकांमध्ये मोठे आकर्षण आहे. हे आकर्षण सोन्याचे दर वाढले तरी वाढतच राहते, असा आतापर्यंतच अनुभव आहे.

gold jewellery   हौस इतकी मोठी की जगात आतापर्यंत जितकं सोनं खाणीतून बाहेर निघालंय त्यापैकी इतक्या सोन्याचे फक्त दागिनेच बनलेत

Gold Jewellery : कधी दागिन्यांच्या स्वरूपात तर कधी बिस्किट किंवा नाण्यांच्या रूपात सोन्याची मोठ्या प्रमाणात खरेदी होते. त्यामुळे सोन्याची मागणी प्रचंड वाढली असून, सोन्याचे दरही गगनाला भिडले आहेत; आज 10 ग्रॅम सोन्यासाठी सव्वा लाखापेक्षा जास्त किंमत मोजावी लागत आहे. त्यामुळे सोने खरेदीदार हवालदिल झाले आहेत. तरीही सण-उत्सव, लग्नसमारंभ असो वा भविष्याची बेगमी, भारतीय समाजात सोन्याला नेहमीच पहिली पसंती दिली जाते. या पार्श्वभूमीवर, जगात आजघडीला नेमके किती सोनं अस्तित्वात आहे, याचा कधी विचार केला आहे का?

वर्ल्ड गोल्ड कौन्सिल (World Gold Council) ही जगभरातील सोन्याचे व्यवहार, साठे आणि किमतीसंदर्भात विश्वासार्ह माहिती गोळा करणारी संस्था आहे. या संस्थेने आपल्या संकेतस्थळावर दिलेल्या माहितीनुसार, आजतागायत जगभरात तब्बल 1 लाख 87 हजार 200 टन सोन्याचे उत्खनन झाले आहे! सोन्याचे आजचे दर पाहता, या साठ्याची किंमत अब्जावधी रुपयांमध्ये सहज जाईल. अशा सोन्याबाबतची अनेक तऱ्हेची रंजक माहिती या संकेतस्थळावर दिली आहे. याच वर्ल्ड गोल्ड कौन्सिलच्या आकडेवारीनुसार, खणून काढलेल्या एकूण 1 लाख 87 हजार 200 टन सोन्यापैकी 49 टक्के, म्हणजेच जवळपास 90 हजार टन सोन्याचे आजमितीस फक्त दागिने आहेत!

हेही वाचा - Muhurat Trading 2025: मुहूर्त ट्रेडिंगमुळे शेअर बाजारात तेजी येणार का? उद्या 'या' वेळेतचं करता येतील व्यवहार

जगात सध्या अस्तित्वात असलेल्या सोन्याचे प्रमाण दुसऱ्या एका आश्चर्यकारक पद्धतीने सांगायचे झाल्यास, सोन्याच्या तारेचा संदर्भ घेता येईल. वर्ल्ड गोल्ड कौन्सिलच्या आकडेवारीनुसार, जगातले हे सगळे सोनं वितळवून त्याची 5 मायक्रॉन इतक्या जाडीची तार तयार केली, तर त्या तारेने संपूर्ण पृथ्वीला तब्बल 1 कोटी 12 लाख वेळा वेढे घालता येतील, इतके सोने आज अस्तित्वात आहे! आपल्या पृथ्वीचा एकूण व्यास 12 हजार 756 किलोमीटरचा आहे, हे लक्षात घेतले तर या सोन्याच्या साठ्याच्या प्रचंडतेची कल्पना येईल. विशेष म्हणजे, हे फक्त आत्तापर्यंत खणून काढलेले सोनं आहे. यापेक्षा कितीतरी पट अधिक सोनं अजूनही पृथ्वीच्या वेगवेगळ्या भागांत जमिनीखाली दडलेले असल्याचा तज्ज्ञांचा अंदाज आहे!

दरम्यान, गुंतवणुकीचं माध्यम म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सोन्याचं मूल्य यापेक्षाही खूप जास्त आहे. भारताने आंतरराष्ट्रीय कर्जातून मुक्त होण्यासाठी आणि देशाच्या विकासासाठी निधी उपलब्ध करण्यासाठी सोन्याचा भलामोठा साठा गहाण ठेवला होता. कधीकाळी भारतातून सोन्याचा धूर निघत होता, असं म्हटलं जातं. भारतात इतकी सुबत्ता होती आणि त्यामुळे सोन्याची इतक्या प्रमाणात मुबलकता होती की, त्याच्या दंतकथाही बनल्या आहेत. याच भारताला गरजेच्या काळात याच सोन्याने मोठा मदतीचा हात दिला होता. सोन्याच्या उपयुक्ततेमुळे आणि सुंदरतेमुळेच या मौल्यवान धातूकडे सार्वत्रिक आणि सर्वकालिक ओढा दिसतो.

हेही वाचा - Rekha Jhunjhunwala : रेखा झुनझुनवालाने काही मिनिटांत कमावले 67 कोटी; 'या' शेअर्समुळे झाला मोठा नफा


सम्बन्धित सामग्री