Hrithik Roshan: बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशनने आपल्या प्रतिमेच्या आणि वैयक्तिक हक्कांच्या संरक्षणासाठी दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेत त्याने विनंती केली आहे की त्याचे फोटो, नाव, व्हिडिओ आणि अन्य सामग्री त्याच्या परवानगीशिवाय कोणत्याही सोशल मीडिया प्लॅटफॉर्म किंवा वेबसाइटवर वापरले जाऊ नये. हृतिकच्या आधी ऐश्वर्या राय, अभिषेक बच्चन, अमिताभ बच्चन, सुनील शेट्टी, नागार्जुन आणि इतर अनेक स्टार्सने अशाच स्वरुपाच्या प्रकरणात न्यायालयाचा दरवाजा ठोठावला आहे.
हेही वाचा - OTT Films : 'या' आठवड्यात प्रेक्षकांना मिळणार मनोरंजनाची मेजवानी! ओटीटी प्लॅटफॉर्मवर 'हे' चित्रपट होणार प्रदर्शित
हृतिक रोशनला बॉलिवूडमध्ये ‘ग्रीक गॉड’ म्हणून ओळखले जाते. तो त्याच्या आकर्षक व्यक्तिमत्त्वासाठी प्रसिद्ध आहे. सोशल मीडियावर त्याच्या आवाजाची आणि शैलीची अनेकदा नक्कल करून व्हिडिओ शेअर केले जातात, ज्यामुळे त्याला आपल्या प्रतिमेच्या हक्कांचे उल्लंघन होत असल्याचा अनुभव येत आहे. अभिनेत्याचे म्हणणे आहे की अशी सामग्री त्याच्या प्रतिमेला हानी पोहोचवत आहे आणि त्याच्या गोपनीयतेचे उल्लंघन करत आहे.
हेही वाचा - KBC Kid Controversy : 'आप रूल्स समजाने मत बैठना...'; केबीसीमध्ये अमिताभ बच्चन यांच्याशी उद्धट बोलणारा 'तो' मुलगा होतोय ट्रोल
भारतामध्ये व्यक्तिमत्त्वाचे हक्क हे एखाद्या व्यक्तीची ओळख, फोटो, व्हिडिओ, नाव, आवाज, स्वाक्षरी किंवा शैली यांना त्याच्या परवानगीशिवाय वापरण्यापासून संरक्षित करतात. हे हक्क गोपनीयता, बदनामी आणि प्रसिद्धी अधिकारांसह न्यायालयात संरक्षित केले जातात. कॉपीराइट कायदा 1957 आणि ट्रेडमार्क कायदा 1999 अशा हक्कांचे संरक्षण करतात आणि सेलिब्रिटींना त्यांच्या कामगिरीवर विशेष आणि नैतिक अधिकार देतात. हृतिक रोशनची ही याचिका फक्त त्याच्या वैयक्तिक संरक्षणासाठी नाही, तर बॉलिवूडमधील इतर स्टार्ससाठीही उदाहरण ठरेल. डिजिटल प्लॅटफॉर्मवर सेलिब्रिटींच्या प्रतिमेचा गैरवापर टाळण्यासाठी हे पाऊल महत्त्वाचे ठरत आहे.