Wednesday, November 19, 2025 12:54:02 PM

WhatsApp हॅक झालंय? त्वरित करा हे 5 महत्त्वाचे उपाय, अन्यथा सगळंच येऊ शकतं धोक्यात!

WhatsApp हॅक झाले तर घाबरून जाण्याची गरज नाही. परंतु, मोठे नुकसान होण्यापूर्वी स्वतःला सुरक्षित करण्यासाठी वेळेवर योग्य पाऊल उचलणे खूप महत्त्वाचे आहे.

whatsapp हॅक झालंय त्वरित करा हे 5 महत्त्वाचे उपाय अन्यथा सगळंच येऊ शकतं धोक्यात

WhatsApp Hacked? : हल्ली अनेकजण आपला जुना फोन बदलतात. एखाद्या वेळेस तुम्ही तुमचा WhatsApp उघडला आणि त्यावर तुम्ही कधीही न पाठवलेले मेसेज किंवा बोलणे दिसले, तर याचा अर्थ तुमचा अकाउंट दुसऱ्या व्यक्तीच्या हातात गेला आहे हे लक्षात घ्या. अशा परिस्थितीत घाबरून जाण्याची गरज नाही. परंतु, मोठे नुकसान होण्यापूर्वी स्वतःला सुरक्षित करण्यासाठी वेळेवर योग्य पाऊल उचलणे खूप महत्त्वाचे आहे.

सर्वात आधी तुम्ही तुमच्या सर्व कॉन्टॅक्ट्सना तुमचे अकाउंट हॅक झाल्याची माहिती द्या, जेणेकरून ते पैसे मागणे किंवा खासगी माहिती विचारणे यासारख्या कोणत्याही संशयास्पद विनंत्यांवर विश्वास ठेवणार नाहीत. त्यानंतर शांत डोक्याने खालील उपाय करा, जेणेकरून अकाउंट परत मिळवणे आणि नुकसान थांबवणे सोपे होईल.

व्हाट्सॲप हॅक झाल्यास तातडीने करा हे उपाय
1. लिंक्ड डिव्हाइसेस तपासा
अनेकदा हॅकर WhatsApp वेब द्वारे किंवा इतर माध्यमातून तुमच्या अकाउंटला दुसऱ्या डिव्हाइसमधून लॉग-इन करतात. यासाठी WhatsApp च्या सेटिंगमध्ये जाऊन 'Linked Devices' तपासा. तुम्हाला कोणतेही अनोळखी डिव्हाइस दिसल्यास, त्याला त्वरित लॉग आउट करा.

2. लॉग-आउट करून री-लॉग-इन करा
लगेचच तुमच्या फोनमधून WhatsApp लॉग-आउट करून पुन्हा लॉग-इन करण्याचा प्रयत्न करा. री-लॉग-इन करताना तुमच्या नंबरवर SMS द्वारे व्हेरिफिकेशन कोड येईल आणि या प्रक्रियेत जुने सत्र (Sessions) आपोआप डिस्कनेक्ट होतात. जर हॅकरला पुन्हा लॉग-इन करायचे असेल, तर त्याला हाच व्हेरिफिकेशन कोड लागेल, म्हणून हे पाऊल खूप महत्त्वाचे आहे.

हेही वाचा - Iphone Battery Life Tips: iPhoneची बॅटरी लवकर संपते? फक्त 3 सेटिंग्ज बदलून दिवसभर वापरा

3. सायबर क्राइम आणि WhatsApp सपोर्टला तक्रार करा
आपल्या स्थितीबद्दल मदत मागण्यासाठी WhatsApp च्या सपोर्ट टीमला (support@whatsapp.com) रिपोर्ट पाठवा. त्याचबरोबर सायबर क्राइम पोर्टलवर तक्रार दाखल करणे देखील खूप उपयुक्त आहे. भारतात तुम्ही 1930 या नंबरवर किंवा अधिकृत सायबर क्राइम वेबसाइट द्वारे तक्रार नोंदवू शकता.

4. SIM कार्ड ब्लॉक करा
जर तुम्हाला तुमचा SIM स्वॅप झाला आहे किंवा मोबाइल नंबर दुसऱ्या व्यक्तीच्या हातात गेला असल्याचा संशय असेल, तर त्वरित तुमच्या नेटवर्क ऑपरेटरशी संपर्क साधा आणि SIM ब्लॉक/रिकव्हरी करून घ्या. अनेकदा हॅकर SIM चा ताबा घेऊन अकाउंटवर नियंत्रण मिळवतात.

5. टू-स्टेप व्हेरिफिकेशन (2FA) ऑन करा आणि पासवर्ड बदला
एकदा तुम्ही अकाउंटचा ताबा परत मिळवल्यानंतर, लगेच टू-स्टेप व्हेरिफिकेशन (2FA) ऑन करा आणि एक मजबूत पिन सेट करा. तसेच, केवळ WhatsApp चेच नव्हे, तर तुमच्या WhatsApp शी लिंक असलेल्या कोणत्याही सर्व्हिसचे पासवर्ड (जसे की Gmail किंवा सोशल अकाउंट्स) त्वरित बदलून टाका.

अतिरिक्त खबरदारी
यासोबतच, तुमचे बँक आणि UPI ॲप्स वर अलर्ट (Alerts) ऑन ठेवा आणि कोणत्याही अनऑथराइज्ड ट्रान्झॅक्शनवर बारकाईने लक्ष ठेवा. घाबरण्यापेक्षा तुम्ही तुमच्या जवळच्या लोकांना अलर्ट करा आणि कोणत्याही खोट्या पैशाच्या विनंतीकडे लक्ष देऊ नका. सतर्कता हीच सर्वात मोठी सुरक्षा आहे, हे लक्षात ठेवा. अनोळखी लिंकवर क्लिक करणे टाळा, OTP कधीही कोणाला देऊ नका आणि नियमितपणे WhatsApp च्या लिंक्ड डिव्हाइसेसची तपासणी करत राहा. तुम्ही त्वरित आणि शांत मनाने पाऊले उचलल्यास, मोठे नुकसान टाळले जाऊ शकते.

हेही वाचा - Old Smartphone : एक्स्चेंजमध्ये गेलेल्या जुन्या स्मार्टफोनचं कंपन्या काय करतात? या फोन्सचं होतं तरी काय?


सम्बन्धित सामग्री