बुलढाणा : बुलढाणा शहरातील सुंदरखेडमध्ये मनाला धक्का देणारे घटना घडली आहे. अनैतिक संबंधातून पत्नीनं पतीला जिवंत जाळलं असल्याचा प्रकार घडला आहे.
जय महाराष्ट्र न्यूजच्या थेट संपर्कात राहण्यासाठी व्हॉट्सअप चॅनेल वर क्लिक करा.
पत्नीच्या अनैतिक संबंधात पतीचा अडसर आल्याने पत्नीने पतीला अंगावर पेट्रोल टाकून जिवंत जाळल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी बुलढाणा शहर पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रणधीर गवई असं मृत माजी सैनिकाचं नाव असून त्याने स्वतः मृत्यू पूर्वी पत्नीने मला जाळल असल्याची माहिती दिली. यावरून पोलिसांनी आरोपी पत्नी लता गवईला ताब्यात घेतले आहे.
हेही वाचा : अमेरिकेच्या सहा जंगलांमध्ये भीषण आग ; एक लाखांहून अधिक नागरिकांचं स्थलांतर
अनैतिक संबंधात पतीचा अडसर होत असल्याने पत्नीने पतीला जिवंत जाळलं असल्याचा धक्कादायक प्रकार बुलढाण्यात घडला आहे. पतीची अशाप्रकारे निघृण हत्या करणाऱ्या पत्नीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलिसांकडून या प्रकरणात अधिकचा तपास सुरू आहे.