Thursday, July 17, 2025 02:28:34 AM

HDFC बँकेच्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! 'या' दिवशी UPI राहणार बंद

जर तुम्ही HDFC बँकेचे ग्राहक असाल आणि UPI वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. HDFC बँकेची UPI सेवा काही काळासाठी बंद राहणार आहे. अशा परिस्थितीत ग्राहकांना सतर्क राहण्याची गरज आहे.

hdfc बँकेच्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी या दिवशी upi राहणार बंद
Edited Image

नवी दिल्ली: सध्याच्या काळात लोक डिजिटल पेमेंटला व्यवहार करण्यासाठी अत्यंत सोपा पर्याय म्हणून स्विकारत आहेत. या धावपळीच्या जीवनात पेमेंटची पद्धतही बदलली आहे. फक्त एका स्कॅनने पेमेंट सहज करता येते. यामध्ये UPI चा मोठा वाटा आहे. दरम्यान, जर तुम्ही HDFC बँकेचे ग्राहक असाल आणि UPI वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. HDFC बँकेची UPI सेवा काही काळासाठी बंद राहणार आहे. अशा परिस्थितीत ग्राहकांना सतर्क राहण्याची गरज आहे.

UPI सेवा 'या' दिवशी बंद राहणार 

HDFC बँक वेळोवेळी आपली प्रणाली अपग्रेड करत असते. यासाठी बँक सिस्टम मेंटेनन्स करते. या कारणास्तव, बँकेने काही काळासाठी UPI सेवा बंद करण्याची घोषणा केली आहे. HDFC बँकेने जारी केलेल्या अलर्टनुसार, UPI सेवा 3 जुलै 2025 रोजी रात्री 11:45 ते 4 जुलै 2025 रोजी दुपारी 1:15 पर्यंत बंद राहील. या काळात, लोक 90 मिनिटे UPI सेवा वापरू शकणार नाहीत. बँकेने हा काळ विचारपूर्वक निवडला आहे कारण या काळात UPI सर्व्हरवरील भार कमी असतो. 

हेही वाचा - RailOne App: रेल्वेने लाँच केले नवी अॅप! तिकीट बुकिंगपासून ते रिफंडपर्यंत मिळणार अनेक सुविधा

तथापि, या काळात लोक UPI पेमेंट करत राहतात. अशा परिस्थितीत, जर तुम्ही यावेळी UPI द्वारे कोणतेही पेमेंट करणार असाल तर आधीच सावधगिरी बाळगा. या डाऊनचा परिणाम HDFC च्या स्वतःच्या मोबाइल बँकिंग अॅपवर होईल. याशिवाय, तुम्ही PhonePe, WhatsApp Pay, Google Pay आणि Paytm सारखे इतर UPI अॅप्सद्वारे देखील व्यवहार करू शकणार नाहीत.

हेही वाचा कॅशची झंझट संपली! आता बँकाप्रमाणे पोस्ट ऑफिसही डिजिटल होणार

बँकेने डाऊन दरम्यान, ग्राहकांना स्वत: जवळ रोख रक्कम ठेवण्याचा सल्ला दिला आहे. यासोबतच, जर काही महत्त्वाचे पेमेंट असेल तर ते आधीच सेटल करा, असंही बँकेने म्हटलं आहे. 


सम्बन्धित सामग्री