मुंबई : वीजचोरी हा अदखलपात्र गुन्हा आहे. इलेक्ट्रिसिटी कायदा २००३ मधील कलम १३५ नुसार दोषी व्यक्तीला दंड किंवा तीन वर्षांपर्यंत तुरुंगवास किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात. विजेची चोरी करणाऱ्यांविरोधात कारवाई करण्यास सुरुवात झाली आहे. मुंबईच्या उपनगरात वीज कंपनीने कारवाईला सुरुवात केली आहे. मालाडच्या कुरार गावात एक कोटी ३३ लाख रुपयांची विजेची चोरी झाल्याचे उघड झाले. या प्रकरणात पोलिसांनी गुन्हा नोंदवलाय. दक्षता पथकाने वीज चोरीची तीन प्रकरणे उघडकीस आणली. यात साडेतीन कोटी रुपयांची वीज चोरी उघड झाली.