नवी दिल्ली: तुम्ही जास्त मोठे व्यवहार करत असाल तर तुम्हाला सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. कारण आयकर विभाग अशा व्यवहारांवर बारीक लक्ष ठेवतो. जर तुमच्या उत्पन्नात आणि व्यवहारांमधून दाखवलेल्या जीवनशैलीत काही फरक असेल तर तुम्हाला आयकर विभागाकडून नोटीस मिळू शकते. बँकांच्या माध्यमातून, आयकर विभाग तुमच्या उत्पन्नावर आणि तुमच्या खर्चावर बारीक लक्ष ठेवतो. सर्व बँकांनी काही महत्त्वाच्या आणि विशेष व्यवहारांची माहिती आयकर विभागाला देणे आवश्यक आहे.
उदाहरणार्थ, जर तुम्ही तुमच्या बचत खात्यात 10 लाख रुपयांपेक्षा जास्त रोख रक्कम जमा केली तर बँक त्याची माहिती आयकर विभागाला देते. दुसरीकडे, जर तुम्ही रोख रक्कम देऊन 10 लाख रुपयांपेक्षा जास्त रक्कम एफडी किंवा आरडी केली तर बँक त्याची माहिती आयकर विभागाला देते.
हेही वाचा - PAN Card, ATM पासून रेल्वेपर्यंत 1 जुलैपासून बदलणार 'हे' नियम! तुमच्या खिशावरही होणार परिणाम
व्यवहार कसे ट्रॅक केले जातात?
आयकर विभाग अशा व्यवहारांवर विशेष लक्ष देतो जे एखाद्या व्यक्तीच्या उत्पन्नाच्या अनुषंगाने दिसत नाहीत. हे व्यवहार वित्तीय संस्थांकडून नियमितपणे स्टेटमेंट ऑफ फायनान्शियल ट्रान्झॅक्शन (SFT) अंतर्गत नोंदवले जातात. यामुळे आयकर विभागाला अनियमितता शोधण्यास मदत होते. आयकर विभाग चालू खात्यात 50 लाख रुपयांपेक्षा जास्त रक्कम जमा करणे, क्रेडिट कार्डद्वारे वर्षात 10 लाख रुपयांचे पेमेंट करणे, म्युच्युअल फंड, डिबेंचर, शेअर्समध्ये आर्थिक वर्षात 10 लाख रुपयांपेक्षा जास्त गुंतवणूक करणे यासारख्या गोष्टींवर लक्ष ठेवते.
हेही वाचा - भारतीयांचा स्विस बँकांमधील सर्व पैसा 'काळा पैसा' आहे का? जाणून घ्या, श्रीमंत लोक इथे पैसे का ठेवतात..
आयकर विभाग बजावू शकते नोटीस -
दरम्यान, आयकर विभागाची नोटीस टाळण्यासाठी करदात्यांनी सर्व नोंदी पूर्ण आणि अचूक ठेवाव्यात. तथापी, वेळेवर रिटर्न भरावे. तसेत तुम्हाला आयकर विभागाकडून नोटीस बजावण्यात आली तर ती सूचना काळजीपूर्वक वाचा. नंतर तुमच्या उत्तरात पारदर्शकता ठेवा. जर काही समस्या असेल तर तुम्ही तुमच्या सीएकडून याबाबत सल्ला घेऊ शकता.