Tuesday, February 17, 2026 11:52:09 PM

Bhutan Tourism : भारतातून भूटानला ट्रेन तर सुरू होतेय; पण इथल्या चलनातील फरक, व्यवहाराची पद्धत जाणून घ्या

दरवर्षी मोठ्या संख्येने भारतीय पर्यटक भूतानला भेट देत असल्याने, येथे नव्याने सुरू होणारी रेल्वेसेवा पर्यटनाला चालना देईल. येथील चलन आणि ते वापरण्याचे काय नियम आहेत, जाणून घेऊ.

bhutan tourism  भारतातून भूटानला ट्रेन तर सुरू होतेय पण इथल्या चलनातील फरक व्यवहाराची पद्धत जाणून घ्या

नवी दिल्ली : फिरायला भूतान (Bhutan) आवडणाऱ्या भारतीयांसाठी एक मोठी आणि महत्त्वाची खुशखबर आहे. भारत सरकारने आता भारत आणि भूतान या दोन देशांदरम्यान रेल्वे कनेक्टिव्हिटीची घोषणा केली आहे. 4 हजार कोटींच्या या प्रकल्पामुळे आसाममधील कोकराझार आणि पश्चिम बंगालमधील बनारहाट येथून भूतानला जोडणाऱ्या नवीन रेल्वे प्रकल्पांची सुरुवात होणार आहे. दरवर्षी मोठ्या संख्येने (जवळपास 1 लाखाहून अधिक) भारतीय पर्यटक भूतानला भेट देत असल्याने, ही रेल्वेसेवा पर्यटनाला मोठी चालना देईल.

भूतानचे चलन आणि त्याचे मूल्य
भूतानच्या अधिकृत चलनाचे (करन्सी) नाव नोंग्त्रुम (Ngultrum) आहे, ज्याला शॉर्टमध्ये BTN असे लिहिले जाते. भारतीय चलनाचा वापर INR साठी केला जातो, त्याचप्रमाणे BTN चा वापर केला जातो. खास बाब म्हणजे, भूतानच्या नाण्यांवर आणि बँक नोटांवर तेथील संस्कृती, राजा, बौद्ध धर्माची प्रतीके आणि नैसर्गिक वारसा छापलेला असतो.
चलनावर नियंत्रण: भूतानच्या चलनाला नियंत्रित करण्याचे काम रॉयल मॉनिटरी अथॉरिटी ऑफ भूतान (Royal Monetary Authority of Bhutan) करते, जे भारताच्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) प्रमाणे भूतानची मध्यवर्ती बँक आहे.

भारताच्या 100 रुपयांचे भूतानमध्ये किती मूल्य?
भारत आणि भूतान या दोन देशांच्या चलनाची तुलना केल्यास, त्यांच्या मूल्यामध्ये फारसा फरक नाही हे स्पष्ट होते. दोन्ही चलनांचे मूल्य जवळपास समान आहे. भारताचा 1 रुपया भूतानमध्ये 1 नोंग्त्रुम होतो. त्यामुळे 100 भारतीय रुपये भूतानमध्ये गेल्यानंतर 100 नोंग्त्रुम होतात. या दोन्ही चलनांच्या मूल्यात सध्या कोणताही फरक नाही.

हेही वाचा - India-EFTA Trade Deal: भारत-ईएफटीए मुक्त व्यापार करार 1 ऑक्टोबरपासून लागू होणार; भारताला काय फायदा होणार? जाणून घ्या

भूतानमध्ये रोख (Cash) वापराचा ट्रेंड
भूतान हा हिमालयीन क्षेत्रात स्थित असल्याने, तेथील बहुतांश शहरांमध्ये एटीएम (ATM) आणि बँकांची संख्या खूपच मर्यादित आहे. अनेक छोटे दुकानदार क्रेडिट कार्ड किंवा चेक स्वीकारत नाहीत. त्यामुळे भूतानमध्ये आजही रोख रकमेचा (Cash) वापर खूप जास्त आहे.
कार्ड पेमेंट : केवळ हॉटेल्स, रिसॉर्ट्स आणि हँडीक्राफ्ट शोरूम्ससारख्या निवडक ठिकाणी क्रेडिट कार्ड स्वीकारले जातात.
भारतीय चलनही वापरता येते : विशेष म्हणजे, भूतानमधील अनेक दुकानदार चलनाच्या किमतीत फारसा फरक नसल्याने भारतीय चलन (Indian Currency) थेट स्वीकारतात, त्यामुळे पर्यटकांना प्रत्येक वेळी चलन बदलून (Exchange) घेण्याची गरज भासत नाही. तथापि, हा नियम संपूर्ण देशात लागू होत नाही.

हेही वाचा - H1b Visa Policy New Update : H-1B गोंधळात भारतीयांना जर्मनीचा आधार; ‘स्थिर व उदार’ स्थलांतर धोरणांची हमी


सम्बन्धित सामग्री