Life Certificate for NRI Pensioners : भारत सरकारतर्फे पेन्शनधारकांना त्यांची पेन्शन (Pension) अखंडितपणे सुरू ठेवण्यासाठी दरवर्षी नोव्हेंबर महिन्यात 'जीवन प्रमाणपत्र' (Life Certificate) जमा करण्यास सांगितले जाते. यावर्षीही पेन्शनधारक ऑनलाइन किंवा ऑफलाइन पद्धतीने हे प्रमाणपत्र जमा करू शकतात. विशेषतः, 80 वर्षांहून अधिक वय असलेल्या पेन्शनर्सना सरकारने ऑक्टोबर महिन्यापासूनच प्रमाणपत्र जमा करण्याची अतिरिक्त मुदत दिली आहे. मात्र, जे पेन्शनधारक भारतात राहत नाहीत, त्यांच्यासाठी हे लाइफ सर्टिफिकेट जमा करण्याचे नियम काय आहेत, हे जाणून घेणे आवश्यक आहे.
परदेशातील पेन्शनधारक असे जमा करू शकतात जीवन प्रमाणपत्र
पेन्शन आणि पेन्शनधारक कल्याण विभागाने (Department of Pension and Pensioners’ Welfare) परदेशात राहणाऱ्या पेन्शनधारकांसाठी नवीन मार्गदर्शक तत्त्वे (Guidelines) जारी केली आहेत. या नियमांनुसार, पेन्शनधारक भारतात न येताही आपले लाइफ सर्टिफिकेट जमा करू शकतात.
बँक अधिकाऱ्याची स्वाक्षरी: जर एखाद्या पेन्शनधारकाला भारतीय रिझर्व्ह बँक अधिनियम, 1934 च्या दुसऱ्या अनुसूचीमध्ये समाविष्ट असलेल्या कोणत्याही बँकेतून पेन्शन मिळत असेल, तर त्यांना स्वतः बँकेत उपस्थित राहण्याची गरज नाही. पेन्शनधारकाच्या लाइफ सर्टिफिकेटवर परदेशातील त्या बँकेचा कोणताही नामित अधिकारी (Designated Officer) स्वाक्षरी (Sign) करू शकतो. ही स्वाक्षरी झाल्यानंतर तुमचे लाइफ सर्टिफिकेट जमा होते आणि पेन्शन चालू राहते.
हेही वाचा - RBI Guidelines: ऑनलाईन फसवणूक थांबवण्यासाठी RBIचा मोठा निर्णय! आता 'या' पद्धतीने ओळखता येईल बनावट वेबसाईट
एजंटद्वारे प्रमाणपत्र जमा करण्याची सुविधा
परदेशात राहणाऱ्या पेन्शनधारकांसाठी किंवा फॅमिली पेन्शन (Family Pension) घेणाऱ्या लोकांसाठी सरकारने दुसरी महत्त्वाची सुविधा उपलब्ध केली आहे.
अधिकृत एजंट: परदेशातील पेन्शनधारकांच्या वतीने त्यांचा अधिकृत एजंट भारतात लाइफ सर्टिफिकेट जमा करू शकतो. यासाठी लाइफ सर्टिफिकेटवर भारतीय मॅजिस्ट्रेट, नोटरी, बँक अधिकारी किंवा राजनयिक प्रतिनिधी (Diplomatic Representative) यापैकी कोणाचीही स्वाक्षरी असणे आवश्यक आहे.
या नियमांमुळे, परदेशात राहणाऱ्या पेन्शनधारकांना त्यांची पेन्शन सुरू ठेवण्यासाठी भारतात येण्याची गरज भासणार नाही.
हेही वाचा - Ration Card: आता घरबसल्या काढता येणार रेशन कार्ड; 'या' ॲपमुळे सोप होणार तुमचं काम