Wednesday, December 11, 2024 01:00:43 PM

India
भारत युरोपला सर्वाधिक तेल निर्यात करणारा देश

'केपलर'च्या (Kpler) अहवालानुसार भारत युरोपला सर्वाधिक तेल निर्यात करणारा देश झाला आहे.

भारत युरोपला सर्वाधिक तेल निर्यात करणारा देश

नवी दिल्ली : 'केपलर'च्या (Kpler) अहवालानुसार भारत युरोपला सर्वाधिक तेल निर्यात करणारा देश झाला आहे. सध्या भारत युरोपला दररोज ३.६० लाख बॅरल शुद्ध कच्चे तेल निर्यात करत आहे. हा आकडा एप्रिल २०२५ पर्यंत दररोज २० लाख बॅरलच्या पुढे जाण्याची शक्यता आहे. युरोपला होणाऱ्या तेल निर्यातीत भारताने सौदी अरेबियाला मागे टाकले आहे. भविष्यात भारत तेल निर्यातीत आणखी आघाडी घेण्याची शक्यता आहे. 

रशिया - युक्रेन युद्ध सुरू झाल्यावर अमेरिकेने रशियावर निर्बंध घातले. यानंतर रशियाने भारताला अशुद्ध कच्च्या तेलाचा पुरवठा मोठ्या प्रमाणात सुरू केला. रशियातून आयात केलेल्या तेलाचे शुद्धीकरण करुन नंतर निर्यात करण्याचा निर्णय भारताने घेतला. या निर्णयाचा भारताला फायदा झाला. आंतरराष्ट्रीय बाजारात भारताने शुद्धीकरण केलेल्या कच्च्या तेलाच्या मागणीत वाढ झाली. वाढत्या मागणीमुळे अल्पावधीत भारत शुद्ध कच्च्या तेलाचा पुरवठा करणारा एक आघाडीचा देश झाला आहे. 


सम्बन्धित सामग्री






jaimaharashtranews-logo