ग्वाल्हेर : भारत आणि बांगलादेश यांच्यातील वीस वीस षटकांच्या सामन्यांची मालिका रविवार ६ ऑक्टोबरपासून सुरू होत आहे. या मालिकेत तीन सामने होणार आहेत. पहिला सामना रविवार ६ ऑक्टोबर रोजी ग्वाल्हेरच्या नव्या माधवराव शिंदे क्रिकेट स्टेडियम येथे होणार आहे. भारतीय वेळेनुसार संध्याकाळी सात वाजल्यापासून सामन्याचे थेट प्रक्षेपण सुरू होईल.
याआधी भारताने बांगलादेश विरुद्धची कसोटी मालिका २ - ० अशी जिंकली. भारताने बांगलादेश विरुद्धचा पहिला कसोटी सामना २८० धावांनी आणि दुसरा कसोटी सामना सात गडी राखून जिंकला.
भारत - बांगलादेश टी - २० मालिका २०२४
प्रत्येक सामन्याचे संध्याकाळी सात वाजल्यापासून थेट प्रक्षेपण
पहिला सामना - रविवार ६ ऑक्टोबर - ग्वाल्हेर, नवे माधवराव शिंदे क्रिकेट स्टेडियम
दुसरा सामना - बुधवार ९ ऑक्टोबर - दिल्ली, अरुण जेटली स्टेडियम
तिसरा सामना - शनिवार १२ ऑक्टोबर - हैदराबाद, राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियम
ग्वाल्व्हेर पहिल्या वीस वीस षटकांच्या सामन्यासाठी संभाव्य संघ या खेळाडूंमधून निवडणार
भारत : अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव (कर्णधार), टिळक वर्मा, रियान पराग, हार्दिक पांड्या, रिंकू सिंग, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, मयंक यादव, अर्शदीप सिंग, जितेश शर्मा, वरुण चक्रवर्ती, नितीश रेड्डी , हर्षित राणा
बांगलादेश : लिटन दास (यष्टीरक्षक), तन्झिद हसन, नजमुल हुसेन शांतो (कर्णधार), तौहिद ह्रदोय, महमुदुल्ला, जाकेर अली, मेहिदी हसन मिराझ, रिशाद हुसेन, मुस्तफिजुर रहमान, तस्किन अहमद, तन्झिम हसन साकिब, महेदी हसन, शरीफुल इस्लाम, रकीबुल हसन, परवेझ हुसेन इमॉन