Tuesday, December 10, 2024 01:49:01 AM

Paralympics
पॅरा ऑलिंपिकमध्ये भारताला चार पदके

फ्रान्सची राजधानी पॅरिस येथे सुरू असलेल्या पॅरा ऑलिंपिक अर्थात दिव्यांगांच्या क्रीडा महाकुंभात भारताने चार पदके जिंकली.

पॅरा ऑलिंपिकमध्ये भारताला चार पदके

पॅरिस : फ्रान्सची राजधानी पॅरिस येथे सुरू असलेल्या पॅरा ऑलिंपिक अर्थात दिव्यांगांच्या क्रीडा महाकुंभात भारताने चार पदके जिंकली. नेमबाज अवनी लेखाराने सुवर्ण, नेमबाज मनिष नरवालने रौप्य, नेमबाज मोना अग्रवालने कांस्य आणि धावपटू प्रीती पालने कांस्य पदक जिंकले. अवनी आणि मोनाने दहा मीटर एअर रायफलमध्ये आणि मनिषने दहा मीटर एअर पिस्तुलमध्ये पदक जिंकले. प्रितीने शंभर मीटर धावण्याच्या स्पर्धेत पदक जिंकले. 

अवनीने यंदा दहा मीटर एअर रायफलमध्ये सुवर्णपदक जिंकले. याआधी अवनीने २०२१ मध्ये टोकियो पॅरा ऑलिंपिकमध्ये सुवर्ण जिंकले होते आणि ५० मीटर रायफल थ्री पोझिशन्समध्ये कांस्यपदकही पटकावले होते.

पॅरिस दिव्यांग क्रीडा महाकुंभ
भारताला चार पदके
नेमबाज अवनी लेखाराला सुवर्ण
नेमबाज मोना अग्रवालला कांस्य
नेमबाज मनिष नरवालला रौप्य
धावपटू प्रीती पालला कांस्य

अवनी आणि मोनाला दहा मीटर एअर रायफलमध्ये पदक
मनिषला दहा मीटर एअर पिस्तुलमध्ये रौप्य
प्रितीला शंभर मीटर धावण्याच्या स्पर्धेत कांस्य


सम्बन्धित सामग्री






jaimaharashtranews-logo