Tuesday, December 10, 2024 01:49:57 AM

Paralympics
दिव्यांगांच्या क्रीडा महाकुंभात भारताला २५ पदके

फ्रान्सची राजधानी पॅरिस येथे सुरू असलेल्या दिव्यांगांच्या क्रीडा महाकुंभात अर्थात पॅरालिंपिकमध्ये भारताने आतापर्यंत २५ पदके जिंकली आहेत.

दिव्यांगांच्या क्रीडा महाकुंभात भारताला २५ पदके

पॅरिस : फ्रान्सची राजधानी पॅरिस येथे सुरू असलेल्या दिव्यांगांच्या क्रीडा महाकुंभात अर्थात पॅरालिंपिकमध्ये भारताने आतापर्यंत २५ पदके जिंकली आहेत. यात पाच सुवर्ण, नऊ रौप्य आणि अकरा कांस्य पदकांचा समावेश आहे. ही भारताची दिव्यांगांच्या क्रीडा महाकुंभातील आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी आहे. 

  1. सुवर्ण - अवनी लेखरा - नेमबाजी - दहा मीटर एअर रायफल
  2. सुवर्ण - कुमार नितेश - बॅडमिटन - पुरुष एकेरी
  3. सुवर्ण - सुमित अंतिल - अॅथलेटिक्स - पुरुष भालाफेक
  4. सुवर्ण - हरविंदर सिंह - धनुर्विद्या - पुरुष एकेरी रिकर्व्ह ओपन
  5. सुवर्ण - धरमबीर नैन - अॅथलेटिक्स - क्लब थ्रो
  6. रौप्य - मनिष नरवाल - नेमबाज - दहा मीटर एअर पिस्तूल
  7. रौप्य - निषाद कुमार - अॅथलेटिक्स - पुरुष उंच उडी
  8. रौप्य - योगेश कथुनिया - अॅथलेटिक्स - पुरुष थाळीफेक
  9. रौप्य - तुलसीमथी मुरुगेसन - बॅडमिंटन - महिला एकेरी
  10. रौप्य - सुहास यथीराज - बॅडमिंटन - पुरुष एकेरी
  11. रौप्य - अजितसिंग यादव - अॅथलेटिक्स - भालाफेक
  12. रौप्य - शरद कुमार - अॅथलेटिक्स - उंच उडी
  13. रौप्य - सचिन खिलारी - अॅथलेटिक्स - गोळाफेक
  14. प्रणव सूरमा - अॅथलेटिक्स - क्लब थ्रो
  15. कांस्य - मोना अग्रवाल - नेमबाजी - दहा मीटर एअर रायफल
  16. कांस्य - प्रिती पाल - अॅथलेटिक्स - महिला १०० मीटर धावणे
  17. कांस्य - रुबिना फ्रान्सिस - नेमबाजी - दहा मीटर एअर पिस्तूल
  18. कांस्य - प्रिती पाल - अॅथलेटिक्स - महिला २०० मीटर धावणे
  19. कांस्य - मनिषा रामदास - बॅडमिंटन - महिला एकेरी
  20. कांस्य - शीतलदेवी आणि राकेश कुमार - धनुर्विद्या - मिश्र
  21. कांस्य - नित्या सिवन - बॅडमिंटन - महिला एकेरी
  22. कांस्य - दीप्ती जीवनजी - अॅथलेटिक्स - महिला ४०० मीटर धावणे
  23. कांस्य - मरियप्पन थांगावेलू - अॅथलेटिक्स - पुरुष उंच उडी
  24. कांस्य - सुंदरसिंग गुर्जर - अॅथलेटिक्स - पुरुष भालाफेक
  25. कांस्य - कपिल परमार - ज्युडो - पुरुष एकेरी ६० किलो वजनी गट जे १

सम्बन्धित सामग्री






jaimaharashtranews-logo